NCP leader Vitthal Langhe present in BJP meeting 
पश्चिम महाराष्ट्र

"राष्ट्रवादी'चे नेते विठ्ठल लंघे भाजपच्या व्यासपीठावर

सुनील गर्जे

नेवासे : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आलेले पक्षाचे नेते विठ्ठल लंघे आज भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. त्यांचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वागत केले. गडाख व घुले यांच्यातील मनोमीलनाचा वचपा काढण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलेली खेळी यशस्वी झाल्याचे मानले जाते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लंघे यांना मतदारसंघात कामाला लागण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे मतदारसंघात मुरकुटे-गडाख-लंघे अशी प्रमुख तिरंगी लढत होणार असल्याची चर्चा होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर अचानक राजकीय समीकरणे वेगाने बदलली. त्यात राष्ट्रवादीने नेवासे मतदारसंघात उमेदवारच दिला नाही. पक्षातर्फे "क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून लंघे यांना विश्‍वासात घेतले नसल्याची चर्चा होती. पक्षाच्या या धोरणामुळे लंघे यांचा हिरमोड झाल्याचेही सांगितले जात होते.

राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार नरेंद्र व चंद्रशेखर घुले न्याय देतील, अशी लंघे यांना अपेक्षा होती. मात्र, घुले बंधुंनीही ऐन वेळी लंघे यांची साथ सोडल्याची चर्चा आहे. त्यामुळे लंघे सैरभैर बनल्याचे सांगण्यात येत होते. नुकत्याच झालेल्या गडाख-घुले यांच्या कुकाणे येथील मनोमीलन मेळाव्याप्रसंगी लंघे अस्वस्थ देहबोली लपवू शकले नव्हते.

त्यांच्यातील ही खदखद लवकरच बाहेर पडणार असल्याचा राजकीय जाणकारांना अंदाज होता. शुक्रवारी दुपारी नेवासे फाटा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेतच लंघे भाजपत प्रवेश करतील, असे सांगण्यात येत होते. तथापि, तो महूर्त हुकला. त्यामुळे मुरकुटे यांनी आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उरकून घेतल्याचे बोलले जाते.

लंघे यांच्यासह त्यांचे समर्थक प्रदीप ढोकणे, राजेंद्र मते, भाऊसाहेब पटारे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे यांनीही भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar may become Vice President: बिहारमध्ये मोठा ‘GAME’ होणार!, भाजपचा मुख्यमंत्री अन् नितीशकुमार थेट उपराष्ट्रपती?

Latest Maharashtra News Updates : मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी मनसे भाजप पदाधिकारी आक्रमक

Gatari Special Kokani Style Kolambi Biryani: अशी बनवा मस्त मसालेदार 'कोकणी पद्धतीची कोळंबी बिर्याणी', लगेच नोट करा रेसिपी

Pratap Sarnaik: नागपूर-नागभीड ब्रॉड गेज मार्ग लवकरच होणार खुला, परिवहन मंत्र्यांनी 'ती' वेळच सांगितली

PMP Tourist Bus : पुणे-लोणावळा मार्गावर ‘पीएमपी’ची पर्यटन बस; प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अकराव्या मार्गावर सेवा सुरू

SCROLL FOR NEXT