पश्चिम महाराष्ट्र

पवार दोन राजेंना गमावणार? साताऱ्यात राष्ट्रवादीचा मार्ग खडतर

सकाळ वृत्तसेवा

सातारा: साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही राजेंनी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षानं टोक गाठल्याचं दिसत आहे. अशातच आज दिवसभर माध्यमांध्ये रामराजे नाईक निंबाळकरांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या.

रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशाराही दिला होता. म्हणूनच आगामी काळात रामराजे शिवसेनेचं शिवबंधन बांधण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत असले तरी रामराजे नाईक निंबाळकरांकडून यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाही.

त्याचबरोबर, रामराजे नाईक निंबाळकरांच्या चर्चा शमतात की नाही तोवर दुसरे राजे म्हणजे शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सोशल मिडीयावर उधाण आले. राजकीय वर्तुळातही यावरून उलटसुलट चर्चांना सुरवात झाली. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट देऊ नये यासाठी शिवेंद्रराजे प्रयत्नशील होते अशा चर्चा लोकसभा निवडणुकीच्यावेळी रंगवण्यात आल्या होत्या आणि शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यात असलेला संघर्षही सर्वश्रुत आहे.

शिवेंद्रराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर हे साताऱ्यातील दोन वजनदार नेते आहेत. या दोन्ही नेत्यांची राष्ट्रवादीतील नाराजीही लपून राहू शकलेली नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मानहाणीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे काही नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी दोन राजेंना गमावल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातच राष्ट्रवादीचा मार्ग खडतर असेल हे नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT