Udayanraje Bhosle Shivendra Raje Bhosale
Udayanraje Bhosle Shivendra Raje Bhosale 
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha 2019 : उदयनराजेंना शिवेंद्रसिंहराजेच पर्याय; 'राष्ट्रवादी'पुढे पेच

प्रवीण जाधव

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत पक्षाला निर्णय घ्यायचा झाल्यास खुद्द शिवेंद्रसिंहराजेंनाच मैदानात उतरावे लागेल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छापूर्तीसाठी शिवेंद्रसिंहराजे शड्डू ठोकणार का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

उदयनराजेंच्या उमेदवारीवरून आमदार गट आक्रमक झाला आहे. पहिल्यांदा ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी उचल खात थेट पक्षाध्यक्षांसमोर नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर आमदारांनी सांगितले तरी, उदयनराजेंचे काम करणार नसल्याची जाहीर भूमिका मांडली. तीच री शहरातील पदाधिकाऱ्यांनी ओढली आहे. आजी-माजी नगरसेवक व नगर विकास आघाडीच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या सदस्यांची बैठक झाली.

त्यांनीही उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध केला. त्यापुढे जाऊन पक्ष दखल घेत नसेल तर, सोडचिठ्ठी द्या, असा मुद्दाही या बैठकीत उपस्थित करण्यात आला आहे. आमदार गटाच्या या टोकाच्या विरोधाच्या तयारीमुळे साताऱ्याची उमेदवारी जाहीर करण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. पक्षानेही आपले पत्ते खुले केलेले नाहीत. त्यामुळे नक्की काय होणार, याची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर आमदार गटाच्या म्हणण्याला पक्षाला होकार द्यायचा असल्यास सर्व आमदारांवर प्रभाव असणारा सक्षम उमेदवार मैदानात असावा लागणार आहे. उदयनराजेंना जशास तशी लढत देऊ शकणारा उमेदवार असला तरच पक्षाकडून तिकीट बदलण्याची 'रिस्क' घेतली जाऊ शकते. सद्य:परिस्थितीत तो चेहरा हा शिवेंद्रसिंहराजेंचाच असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यासाठी विविध दाखलेही दिले जात आहेत. 

सातारा तालुक्‍यावर शिवेंद्रसिंहराजेंची असलेली भक्कम पकड हे या सर्वांचे मूळ आहे. मतदारसंघाच्या विभाजनानंतर पहिला विधानसभेचा सातारा मतदारसंघ हा तीन मतदारसंघांमध्ये विभागला गेला. कोरेगाव, कऱ्हाड उत्तर व सातारा-जावळी हे ते तीन मतदासंघ आहेत. कोरेगाव व कऱ्हाड उत्तर मतदारसंघांमध्ये सातारा तालुक्‍यातील मते निर्णायक आहेत. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंचा प्रभाव आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतदार आमदार शिवेंद्रसिंहराजेंसाठी पूर्ण क्षमतेने मैदानात उतरणार. 

सातारा-जावळीमध्ये तर, ते स्वत: आमदार आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील निर्णायक मतदानावर त्यांचा थेट अंकुश आहे. कऱ्हाड दक्षिणमध्ये मित्रपक्षाचे आमदार आहेत. तर, विरोधी पक्षात नातेसंबंधांचा फायदा त्यांना होऊ शकतो. पाटण व वाईमध्येही शिवेंद्रसिंहराजे मैदानात असले तर, मतांच्या आकडेवारीत चांगला फरक पडू शकतो. 

जिल्ह्यातील एकंदर राजकारणामध्ये शिवेंद्रसिंहराजेंचे वर्चस्व पाहता त्यांच्याइतकी प्रभावी लढत दुसरा कोणी देऊच शकत नाही. त्यामुळे पक्षाध्यक्षांनीही तशी 'हिंट' दिल्याची चर्चा बाहेर येते आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांचा नाराजीचा सूर आहे. उदयनराजेंच्या भूमिकांचा विरोध सर्वांनी जाहीरपणे वाढदिवसाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून दाखवून दिला आहे. तसेच त्यानंतर सर्वांनी एकत्रित पक्षाध्यक्षांची भेट घेऊनही गाऱ्हाणी मांडली. त्यानंतर अन्य आमदार शांत असले तरी, शिवेंद्रसिंहराजेंच्या गोटातून विरोध सुरूच आहे. त्यांची मागणी मान्य करायची झाल्यास पक्षासमोर शिवेंद्रसिंहराजे मैदानात उतरण्याशिवाय चांगला पर्याय असणार नाही. त्यामुळे कार्यकर्ते व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी ते मैदानात उतरून शड्डू ठोकणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

अभयसिंहराजेही होते खासदार! 
महत्त्वाचे म्हणजे पूर्वी सातारा व कऱ्हाड असे दोन स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ असताना शिवेंद्रसिंहराजेंचे वडील (कै.) अभयसिंहराजे भोसले हे एकदा एकत्रित कॉंग्रेसच्या वतीने सातारा लोकसभा मतदारसंघातून सर्वमान्य उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्‍याने निवडूनही आले होते. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूक तशी नवी असणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT