corona logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

रेठरेधरणच्या 'त्या' रुग्णाचा अहवाल 'निगेटिव्ह'!

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर-वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथील कोरोनाबाधित रुग्णाचा कोरोना तपासणीचा अहवाल काल (ता. 16) निगेटिव्ह आला आहे. सध्या या रुग्णावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत. सहा दिवसांपूर्वी हा रुग्ण 'कोरोना पॉझिटिव्ह' आढळला होता. याबाबत मुंबई येथून कुटुंबियांना तशी माहिती कळविण्यात आली आहे. वाळवा प्रशासनानेही त्याला आज दुजोरा दिला.

मागील आठवड्यात शुक्रवारी (ता. 11) रेठरेधरण येथील 65 वर्षे वयाच्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर इकडे जिल्ह्यात खळबळ माजली होती. ही व्यक्ती 20 दिवस गावाकडे होती. त्यांना मुळात किडनीचा आजार असल्याने त्यांच्यावर आधीपासूनच मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गावाकडे असताना किडनीचा जास्तच त्रास होऊ लागल्याने त्यांना इस्लामपूर येथील एका खासगी रुग्णालयात तीन दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर हा त्रास सुरूच राहिल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून मुंबईला हलविण्यात आले होते. तिकडे नेल्यानंतर मात्र तेथील रुग्णालयात तपासणीनंतर त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे वाळवा तालुका प्रशासन हादरले होते.

पूर्ण रेठरे धरण गाव सील करून प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या होत्या. इस्लामपूर येथे तीन दिवस उपचार घेतल्याने इस्लामपुरात नगरपालिकेने देखील गेले तीन दिवस शहर पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. या रुग्णाशी संबंधित 31 जणांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. सुदैवाने त्यांचे कुटुंबीय व संबंधित या सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले होते. त्या रुग्णावर सध्या मुंबईच्या वाशी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले होते. यादरम्यान काल (ता. 16) पुन्हा एकदा या रुग्णाचे स्वब तपासण्यात आल्यानंतर अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.


"रेठरेधरण मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या होत्या, आज तेथील रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा करून पुढील उपाययोजनाच्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल."
रविंद्र सबनीस, तहसीलदार. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT