पश्चिम महाराष्ट्र

वाहतूक बंद होऊनही "धोका' उभाचं ; ढेबेवाडीचा पूल हटविण्याकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी : वाहतूक बंद केलेले जुने पूल धडाधड कोसळत असताना ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील येथील वांग नदीवरचा जुना पूल मात्र बांधकाम विभागाने आठ वर्षांपासून तसाच ठेवला आहे. या पुलाशेजारी बांधलेल्या नवीन उंच पुलावरून सध्या वाहतूक सुरू असली तरी जुन्या पुलावर अजूनही कपडे व वाहने धुण्यासह मासेमारीसाठी सुरू असलेली लोकांची वर्दळ ध्यानात घेऊन दुर्घटनेपूर्वीच हा पूल हटविण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. 

ढेबेवाडीजवळ वांग नदीवर पूल नसल्याने पूर्वी लोकांना काहिलीतून ये-जा करावी लागायची. त्यानंतर सुमारे साठ वर्षांपूर्वी नदीवर दगडी दाऱ्याचा पूल बांधण्यात आला. त्यावेळी कमी उंचीच्या पुलाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला होता. मात्र, त्यास कुणी जुमानले नाही. कऱ्हाड- ढेबेवाडी मार्गावरचा हा महत्त्वाचा पूल असला तरी पावसाळ्यात वारंवार तो पाण्याखाली राहून वाहतूक विस्कळित होण्याचे प्रकार घडायचे. दरम्यानच्या काळात वाहतुकीचा वाढता ताण आणि सतत बसणाऱ्या पुराच्या तडाख्याने धोकादायक बनलेला हा पूल हटवून नवीन उंच पुलाची मागणी जनतेतून जोर धरू लागल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान कार्यालयातील मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून पुलाचे बांधकाम मार्गी लागून जुन्या पुलाजवळच तातडीने नवीन उंच पूल उभारण्यात आला, सध्या त्यावरूनच वाहतूक सुरू असली तरी त्यालगतचा जुना धोकादायक पूल बांधकाम विभागाने तसाच ठेवल्याने दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. जुन्या पुुलावरील वाहतूक आठ वर्षांपासून बंद असली तरी कपडे व वाहने धुण्यासह मासेमारीसाठी पुलावर नेहमी मोठी गर्दी असते. जवळच पाचूपतेवाडीची समशानभूमी असल्याने अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जनास येणारे ग्रामस्थही पुलावर गर्दी करतात. गणेशमूर्ती विसर्जनादिवशीही तेथे झुंबड असते. मराठवाडी व महिंद धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यात अडविल्याने आता वर्षभर या पुलाजवळ तुडुंब पाणी असते. सतत पाण्यात राहिल्याने आणि लगतच नदीच्या दोन प्रवाहाचा संगम होत असल्याने पुलाचे दगडी पिलर निसटत चालले आहेत. दुर्घटनेपूर्वीच हा पूल हटविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Latest Marathi News Updates : ससून डॉक वाचवा; कोळी बांधवांचा हक्क जपा!

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Heavy Rain in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे नव्या खड्ड्यांची भर, मार्ग काढणेही अडचणीचे

SCROLL FOR NEXT