पश्चिम महाराष्ट्र

लाड - कदम घराण्याचे मनोमिलन?

संतोष कणसे

कडेगाव - लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना कुंडलचे लाड व सोनसळचे कदम या एकेकाळी विरोधक असलेल्या दोन राजकीय घराण्यांचे मनोमिलन झाल्याचे दिसले. त्याची जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

कुंडलच्या लाड घराण्याचे कुटुंबप्रमुख व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड आतापर्यंत डॉ. पतंगराव कदम यांच्या विरोधात भूमिका घेत आले. ते कदम यांचे राजकीय विरोधक असलेल्या पृथ्वीराज देशमुख यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करत. तसे पाहिले तर श्री. लाड व दिवंगत डॉ. कदम यांच्यात कधीही टोकाचा संघर्ष झाला नाही किंवा नव्हताही. परंतु, लाड यांचा त्यांना विरोध मात्र होता. त्याचे कारण म्हणजे कुंडलचे स्थानिक राजकारण.

डॉ. पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड व अरुण लाड यांच्यात येथे उभा सत्तासंघर्ष अनेक वर्षे सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत की, सहकारी संस्थांच्या निवडणुका, महेंद्र लाड विरुद्ध अरुण लाड असा जोरदार राजकीय संघर्ष ठरलेलाच. या संघर्षात महेंद्र लाड यांना डॉ. कदम यांचा राजकीय पाठिंबा मिळे. त्यामुळे अरुण लाड यांना राजकीय सत्ताकेंद्र वर्चस्वाखाली ठेवण्यासाठी नेहमी डॉ. कदम यांचे विरोधक असलेल्या पृथ्वीराज देशमुख यांची मदत घ्यावी लागे. आणि अन्यवेळी द्यावीही लागे.

आमदार संपतराव देशमुख यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. पतंगराव कदम यांना पराभूत केलेल्या पृथ्वीराज व त्यांचे चुलत बंधू संग्रामसिंह देशमुख यांनी गतवेळी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला; तर जातीयवादी पक्षात जाणार नाही, अशी भूमिका घेऊन अरुण लाड यांनी राष्ट्रवादीत राहणे पसंद केले. तरीही लाड-देशमुख यांचा राजकीय घरोबा कायम होता.

आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यात लाड-देशमुख यांच्यातील मैत्रीपर्वाला काही कारणांनी ब्रेक लागला. काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज देशमुख व अरुण लाड या एका नाण्याच्या दोन बाजू होत्या. आता नाहीत, असा खुलासा अरुण लाड यांनी केला. त्यामुळे लाड व देशमुख यांचे राजकीय संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत, हे स्पष्ट झाले. तर डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत अरुण लाड यांनी विश्वजित यांना विनाअट पाठिंबा जाहीर केला.

लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त पुन्हा अरुण लाड व आमदार विश्वजित कदम यांनी हातात हात घेऊन एकत्रितपणे पलूस-कडेगाव तालुक्‍यात प्रचार दौरा केला. आता तर लाड-कदम यांच्यातील मनोमिलन झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. 

कुंडलमध्ये तंटामुक्ती कधी?
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मात्र चांगलीच घट्ट आहे. कुंडल येथील स्थानिक राजकारणात अरुण लाड व महेंद्र लाड यांच्यात राजकीय स्पर्धा आहेच. त्यांचे मनोमिलन करून तंटामुक्ती होणार का? त्यासाठी आमदार विश्वजित प्रयत्न करणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT