Doctor
Doctor 
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात पुढच्या वर्षी मेडिकल कॉलेज

प्रवीण जाधव

सातारा - जिल्हा रुग्णालयाची इमारत व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाला तीन वर्षांसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय काल राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षीपासून सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

आघाडी शासनाच्या काळात पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना साताऱ्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. परंतु, मंजुरीपासूनच ते वादाच्या फेऱ्यात अडकले. सुरवातीला खावली येथे हे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जागाही हस्तांतरित करण्यात आली.

मात्र, नंतर हे रुग्णालय कृष्णानगर येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेमध्ये सुरू करण्याचा निर्णय झाला. या जागेच्या हस्तांतरणाला चार वर्षे गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आश्‍वासनानंतर जागेचा विषय मार्गी लावला. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे काम मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु, वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया थांबवायची का, असा प्रश्‍न समोर आला होता. 

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या किमान निकाषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी किमान ३०० खाटांचे रुग्णालय आवश्‍यक आहे. अशा रुग्णालयाची सुविधा झाल्याशिवाय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू करता येत नाही. त्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची सध्याची इमारत व यंत्रणा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा विषय समोर आला होता. तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आलेला होता. त्यानुसार काल शासनाने जिल्हा रुग्णालयाची इमारत व यंत्रणा काही अटी, शर्तींनुसार वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा अध्यादेश काढला आहे. 

त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी महाविद्यालयाच्या नवनियुक्त अधिष्ठात्यांबरोबर हस्तांतरणाबाबतचा तीन वर्षांचा करार करावयाचा आहे. तसेच अधिष्ठात्यांनी तीन वर्षांत स्वत:ची यंत्रणा उभी करावयाची आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक हे प्रतिनियुक्तीने अधिष्ठाता यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुग्णालयाचे काम पाहणार आहेत. जिल्हा रुग्णालयातील सध्याचा नेत्रविभाग व फिरते नेत्रपथक हे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिपत्याखाली राहणार आहे. नेत्र विभागाबरोबरच स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट, डायलिसीस व डिआयसीई या सुविधांसाठीचा तांत्रिक कर्मचारी वर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचा असणार आहे. परंतु, त्यावर प्रशासकीय नियंत्रण हे जिल्हा शल्यचिकित्सकांचे राहणार आहे. पीसीपीएनडीटी, गर्भपात, कुटुंब नियोजन, वैद्यकीय निष्काळजीपणा अशा विविध समित्यांचे सम्मुचीत प्राधिकारी हे जिल्हा शल्यचिकित्सकच राहणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील एस. एन. सी. यु., आर. बी. एस. के., आयुष, जे. एस. एस. के. असे सर्व विभाग व कंत्राटी कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखाली असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT