शिवाजी उद्यानात दाखल होणार विमान sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी : शिवाजी उद्यानात दाखल होणार विमान

संरक्षण खात्याच्या एअर क्राफ्ट अंतर्गत परवाना

अमोल नागराळे

निपाणी: येथील राष्ट्रीय महामार्गावरील बेळगाव नाका बोगद्याजवळील छत्रपती शिवाजी उद्यानात लवकरच केंद्र शासनाच्या संरक्षण खात्याच्या सहकार्याने एअरक्राफ्ट प्रकल्पांतर्गत विमान दाखल होणार आहे. यामुळे विमान शौकिनांसह विमानाचे आकर्षण असणारयांना त्यास जवळून पाहता येईल. एवढेच नव्हे तर विमान काय आहे?, ते कसे कार्य करते?, त्याचे प्रकार यासह वेगवेगळ्या पातळीवर विमानाचा अभ्यास करण्याची संधी लाभणार आहे.

खासदार अण्णासाहेब जोल्ले हे केंद्रीय संऱक्षण खात्याच्या स्थायी समितीवर सदस्य आहेत. त्यामुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकारयांसोबतच्या विविध बैठकांना ते हजर असतात. काही दिवसापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे बंगळूर दौरयावर आल्यावर खासदार अण्णासाहेब जोल्ले,मंत्री शशिकला जोल्ले यांनी निपाणीत एअर क्राफ्ट निर्माणसाठी परवाना देण्याची मागणी पत्राव्दारे केली होती. त्यानुसार गोवा येथील लढाऊ विमानांच्या तळावरील एक विमान त्या क्राफ्टसाठी देण्याची विनंती करण्यात आली होती.

त्यावेळी मंत्री राजनाथ सिंग यांनी एअर क्राफ्टसाठी परवान्याची ग्वाही दिली होती. आता प्रत्यक्षात एअर क्राफ्ट प्रकल्पासाठी परवाना मिळाल्याने लवकरच निपाणीत विमान दाखल होणार आहे. पालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी उद्यानात विमान थांबण्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता गोवा येथील लढाऊ विमानांच्या प्रशासनाची पालिका पदाधिकारी, अधिकारी भेट घेऊन विमान हस्तांतरणाबद्दल माहिती घेणार आहेत. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विमानाचे सुटे भाग आणून येथे विमान जोडले जाणार आहे. त्यासाठी फौंडेशनसह पूरक कामे करून घ्यावी लागणार आहेत. विमान जोडल्यावर ते प्रदर्शनासाठी कायमस्वरुपी खुले राहणार आहे.

एअरक्राफ्टमध्ये करिअर करू इच्छिणारया विद्यार्थ्यांमध्ये एअरक्राफ्ट इजिनिअरींग ही लोकप्रिय शाखा बनली आहे. एअरक्राफ्ट प्रकल्पामुळे विमान दुरुस्ती, विमान जोडणे, विमानात मिळणारया सुविधा, आसन व्यवस्था याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. शिवाय विमानाचे इलेक्ट्राॅनिक्स, इलेक्ट्रीकल आणि मेकॅनिकल पार्ट कसे असतात, याबद्दलही मार्गदर्शक माहिती मिळणार आहे.

अण्णासाहेब जोल्ले

एअर क्राफ्ट अंतर्गत निपाणीत विमान दाखल होणार आहे. संरक्षण खात्याकडे निपाणीत एअर क्राफ्टसाठी परवान्याची मागणी केली होती. त्याला परवाना मिळाल्याने लवकरच गोवा येथून निपाणीत विमान दाखल होईल. शहर परिसरातील लोकांना विमान जवळून पाहण्यासह त्याचा अभ्यास करण्यासाठी हे विमान उपयुक्ट ठरेल.

-अण्णासाहेब जोल्ले,खासदार, चिक्कोडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lingayat Community : लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका, सर्वोच्च संस्थेच्या आवाहनाने राजकारणात खळबळ

US Open 2025 : कार्लोस अलकाराजने जिंकला सहावा ग्रँड स्लॅम, जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

Ganpati Visarjan 2025: 'फलटणला दगडफेक; १३ जणांना अटक', जिंती नाक्‍यावर दोन मंडळांच्‍या कार्यकर्त्यांचा राडा

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदी उद्या पंजाबमधील पूरग्रस्त भागाचा करणार दौरा, आर्थिक मदतीची घोषणा करण्याची शक्यता

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'Avocado Paneer Toast', सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT