सुनील पाटील sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी : यरनाळचे सुनील पाटील बनले राजपत्रीत अधिकारी

एमपीएससीकडून नियुक्ती पुण्यात सहाय्यक रासायनिक विश्लेषक पदावर रुजू

अमोल नागराळे

निपाणी : यरनाळ ता. निपाणी येथील सुनील बाळासो पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) कडून महाराष्ट्र शासनाच्या महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) आस्थापनेवर सहाय्यक रासायनिक विश्लेषक पदावर राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानुसार सुनील हे पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत रुजू झाले आहेत.

यरनाळसारख्या खेड्यात सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या सुनील यांनी मेहनत आणि चिकाटीच्या बळावर स्वतःला सिध्द केल्याने त्यांचे निपाणी भागातून कौतूक होत आहे. एमपीएससीमार्फत २०१८-१९ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. ती परीक्षा सुनील उत्तीर्ण झाल्याने सहाय्यक रासायनिक विश्लेषक या पदावर नेमणूक झाली आहे.

बालपणीच त्यांचे वडील बाळासो पाटील यांचे निधन झाले. परिणामी आई वैजयंता पाटील यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. अशा परिस्थितीत मामा खामकर यांच्या नौतिक पाठबळाच्या आधारे सुनील यांचे प्राथमिक शिक्षण यरनाळ तर माध्यमिक शिक्षण अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयात झाले. देवचंद महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले. तेथून बी. एस्सी. पदवीचे शिक्षण क्रांतीसिंह नाना पाटील महाविद्यालय (वाळवा) आणि एन. डी. पाटील महाविद्यालय (मलकापूर) येथे झाले. शिवाजी विद्यापीठाच्या डाॅ. अप्पासाहेब पवार कमवा व शिका योजनेंतर्गत रसायनशास्त्र अधिविभागातून एम. एस्.सी ही पदव्युत्तर पदवी संपादन केली.

विशेष म्हणजे सुनील यांच्या आई वैजयंता मजूरीवर जाऊन त्यांच्यावर संस्कार घडविले आहेत. घरची परिस्थिती लक्षात घेऊन सुनील यांनी अकरावीपासून एम. एस्सी. पर्यंत कमवा व शिका उपक्रमांतर्गत शिक्षण घेऊन नव्या पिढीसमोर स्वावलंबनाचा आदर्श ठेवला आहे. सुनील यांनी राजाराम महाविद्यालय (कोल्हापूर), घाळी महाविद्यालय (गडहिंग्लज) व डी. आर. माने महाविद्यालय (कागल) येथे रसायनशास्त्र विभागात ज्ञानदानाचे कार्य केले आहे. हल्ली स्पर्धा परीक्षा देणारयांची व उत्तीर्ण होणारयांची संख्या मोठी आहे. पण परीक्षा उत्तीर्ण होण्यासह सुनील यांना वरिष्ठ पदावर सेवेत रुजू होण्याची संधी मिळाली आहे.

स्पर्धा परीक्षा देण्यारयांची संख्या वाढली आहे. तरीही नव्या पिढीतील तरूणांनी जिद्द व चिकाटी सोडता कामा नये. त्यांनी शांत विचाराने आपल्या करिअरची दिशा निश्चित केली पाहिजे. कुटुंबीयांचे पाठबळ आणि सर्वांच्या सहकार्यामुळे मला महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू होण्याची संधी मिळाली. निपाणी भागातील नव्या पिढीसाठी माझे नेहमी मार्गदर्शन राहील.

-सुनील पाटील, राजपत्रित अधिकारी, वैज्ञानिक प्रयोगशाळा, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT