nishikant patil press conference islampur jayant patil
nishikant patil press conference islampur jayant patil 
पश्चिम महाराष्ट्र

...तर मला गांधी चौकात फाशी द्या! 

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याला काळिमा फासण्याचे काहींचे प्रयत्न असून माझे चांगले काम न बघवणारे लोक माझ्याविरोधात कुटील राजकारण करत असल्याचा आरोप इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता आज येथे पत्रकार परिषदेत केला. सत्तेचा दुरुपयोग करून माझी प्रतिमा मलीन करणे सुरू आहे, मी दोषी आढळलो तर मला गांधी चौकात फाशी द्या, असेही ते यावेळी म्हणाले. 

नगराध्यक्ष पाटील यांच्या संस्थेशी संबंधित व्यक्तींवर इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. 

ते म्हणाले, "पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षांची चौकशी करणार असल्याचे समजले. त्याला माझे पूर्ण सहकार्य राहील. २३ मार्चला इस्लामपुरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यावेळी मी स्वतः सहकारी घेऊन प्रशासनासोबत तो भाग बंदिस्त केला व आवश्यक त्या उपाययोजना केल्या. मणेर कुटुंबाव्यतिरिक्त अन्य रुग्ण आढळू नयेत म्हणून २३ मार्चपासून ते आजतागायत खूप खबरदारी घेतली आहे. यादरम्यान या कुटुंबाच्या बाबतीत अपप्रचार सुरू होता, त्याविषयी खूपच वाईट वाटले. तो अपप्रचार थांबविण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले. त्या कुटुंबाची भेट घेऊन, चौकशी करून धीर दिला. कदाचित हे हिंदू-मुस्लिम ऐक्य काही समाजकंटकांना पाहावले नाही, त्यामुळे आज माझ्यावर आरोपाची वेळ आली असावी. माझे स्वीय सहायक अन्य दोघे आहेत, तरीही ही कायदेशीर बाब असल्याने त्यावर वेळ आल्यावर मी बोलेन. नगराध्यक्ष म्हणून माझे चांगले सुरू असलेले काम बघवत नसल्याने माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. ते सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. ही चांगली संस्कृती नसून दर्जाहीन राजकारण आहे. दुर्दैवी आहे. त्याचा मी निषेध करतो. मी इस्लामपूरचा रहिवासी आणि प्रथम नागरिक असून पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी आहे. कृष्णात पिंगळे यांची वेळ घेऊन स्वतःची भूमिका मांडेन. त्यात कुठे दोषी आढळलो तर गांधी चौकात मला फाशी द्यावी. माझ्याविरोधात सुरू असलेले घाणेरडे राजकारण थांबवावे. माझ्या सहकाऱ्यांना त्रास देऊ नये. हा प्रयत्न लोकशाही मानणारे नागरिकच हाणून पडतील. ज्या मेसेजवरून गुन्हे दाखल झाले, असे मेसेज अनेक ग्रुपवर तसेच कट्टर जयंतप्रेमी याही ग्रुपवर फिरले आहेत. त्याची यादी पोलिसांना सादर करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी खरेच मुळात जाऊन चौकशी करावी. शहराच्या हिंदू-मुस्लिम ऐक्याला काळिमा फासू नये. माझ्या संस्थेत 1200 कर्मचारी कार्यरत आहेत, संस्थेत मोफत उपचार केले जातात, जिल्ह्यातील अनेकजण उपचार घेतात हे त्यांना पचनी पडले नसावे, त्यामुळे कुटील राजकारण सुरू आहे, त्यांनी हे थांबवावे." नगरसेवक वैभव पवार, अजित पाटील, अशोक खोत, चंद्रकांत पाटील, प्रसाद पाटील, भास्कर कदम उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT