no control of police on vehicle's horns & headlights
no control of police on vehicle's horns & headlights 
पश्चिम महाराष्ट्र

फोकस हेडलाईटसह कर्णकर्कश हॉर्नही सुसाट

सकाळवृत्तसेवा

सोन्याळ : परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या हेडलाईट व डेसिबल मर्यादेचा विचार न करता अधिक क्षमतेचे व विविध प्रकारच्या व रंगांच्या फोकस (प्रखर) दिवे आणि कर्णकर्कश हॉर्न बसवून अनेक वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवीत आहेत. ग्रामीण भागातही अशा वाहनांची संख्या वाढत आहे. प्रखर दिव्यामुळे अनेकवेळा अपघात आणि डोळ्यावर परिणाम होताना दिसत आहे. कर्णकर्कश आवाजामुळे शाळा, महाविद्यालय व दवाखाने, तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर सामान्य नागरिक व वाहनचालक त्रस्त आहेत. पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

केंद्र सरकारने नुकतेच लागू केलेल्या वाहन कायद्यात कोणत्या वाहनास किती डेसिबल क्षमतेचे हॉर्न आणि दिवे (हेडलाईट) वापरावेत याचे नियम ठरवून देण्यात आले आहेत. दुचाकी व चारचाकी मोटारी व मालवाहतूक वाहनउत्पादक करणाऱ्या विविध कंपन्यांनी गाडीला बसविलेले हॉर्न परिवहन विभागाच्या नियमानुसार योग्य क्षमतेचे बसविलेले असतात. मात्र, रस्त्यावर काही तरी वेगळेपण दाखविण्याची सवय जडलेल्या काही वाहनधारकांना हे हॉर्न लक्षवेधी वाटत नाहीत. पादचारी, अन्य वाहनधारकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी त्यांना सायरन किंवा म्युझिकल हॉर्न लावावेसे वाटतात. 

तरुणाईलाही कर्णकर्कश हॉर्नचे विशेष आकर्षण दिसत आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे हॉर्न आणि विविध प्रकारच्या रंगाची प्रखर दिवे मिळत आहेत. डोळ्यावर परिणाम करणाऱ्या प्रखर दिव्यामुळे समोरील वाहन व्यवस्थित दिसत नसल्याने अपघात होत आहेत. अशा हॉर्नची व प्रखर दिव्याची वॉरंटी वा गॅरंटी नसली, तरी तरुणाईचा खरेदीकडे कल आहे. 

नियम डावलण्याकडे कल 
कायद्यात तरतुदी असतानाही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेष जागृती होत नसल्याने, तसेच दंडात्मक कारवाईचे प्रमाण कमी असल्याने कर्णकर्कश हॉर्न बसविण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. दुचाकी, मोटारी, हलकी वाहने, मालवाहू वाहने यांच्याकरिता हॉर्न आणि फोकस हेडलाईट बाबत काही नियम आहेत. मात्र, नियम डावलून अनेक जण प्रखर दिवे वापरातात. तसेच काही महाभागांनी दुचाकीलासुद्धा कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचे हॉर्न बसविले आहेत, तर काहींनी लहान मुलांच्या रडण्याचे, कुत्र्याच्या भुंकण्याचे किंवा सायरनसारखे आवाज काढणारे हॉर्न बसविले आहेत. 

प्रबोधनाची गरज 
शाळा, महाविद्यालये, दवाखाने आदी ठिकाणी हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. मात्र, याची माहिती वाहनचालकांना नसावी, अशी स्थिती आहे. या सर्व ठिकाणांपासून कर्कश हॉर्न वाजवीत भरधाव जाणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिक करीत आहेत. कर्णकर्कश हॉर्न या विषयाबाबत जागृती करण्यासाठी सामाजिक व स्वयंसेवी संघटनांसह, परिवहन खात्याने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT