no objection certificate for beer bar
no objection certificate for beer bar 
पश्चिम महाराष्ट्र

बिअरबारच्या ना हरकत दाखल्यासाठी 25 हजार 

संतोष सिरसट

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे ना हरकत दाखला घेण्यासाठी अनेक प्रस्ताव येतात. त्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे बिअरबारच्या ना हरकत दाखल्यासाठी आता पाच हजारांऐवजी 25 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. 

आरोग्य समितीत निर्णय झाल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत 10 प्रकारच्या ना हरकत दाखल्यांसाठीच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल पंप, खडीक्रशर, खासगी दवाखाना, सिनेमागृहासाठी पाच हजारांवरून 10 हजार, कत्तलखान्यासाठी पाच हजारांवरून 25 हजार, बिअरशॉपी एक हजारांवरून 10 हजार, मिनरल वॉटर प्लॉट एक हजारांवरून पाच हजार, कारखान्यासाठी दोन हजारांवरून पाच हजार, सिमेंट फॅक्‍ट्रीसाठी 25 हजारांवरून 50 हजार रुपयांचे शुल्क आकारले जाईल. शेतीपूरक व्यवसाय, छोटे दुकानदार, शैक्षणिक प्रयोजन व सामान्य नागरिकांच्या हिताच्या ना हरकत दाखल्यासाठी कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सभापती शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला अरुण तोडकर, स्वाती कांबळे, अतुल खरात, अण्णाराव बाराचारे, प्रभावती पाटील उपस्थित होते. 

जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत डेंगीचे 76 रुग्ण आढळले आहेत. डेंगीबाबत तालुकास्तरीय कार्यशाळा झाल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बसविण्याचा निर्णय झाला. 
शिवानंद पाटील, सभापती, आरोग्य समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT