पश्चिम महाराष्ट्र

नौकानयन ‘रामभरोसे’...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - नौकानयन आणि जलविहार याचा जरूर एक वेगळा आनंद आहे. किंबहुना नौकानयन ही आबालवृद्धांच्या मनात दडलेली एक इच्छा आहे; पण जिल्ह्यात आपण ज्या ठिकाणी व्यावसायिक नौकानयनाचा आनंद घेतो त्या नौकानयनासाठी सुरक्षेची अंतिम नियमावली गेल्या १५ वर्षांत निश्‍चितच झाली नसल्याने स्पष्ट झाले आहे.

नौकानयन विहारात या काळात मोठी दुर्घटना घडलेली नाही. हे खूप चांगले झाले आहे; पण चुकून दुर्घटना घडलीच तर नौकानयनाची नियमावली शोधावी लागणार, अशी कोल्हापुरात परिस्थिती आहे. नौकानयन चालवणाऱ्यांनी त्यांच्या परीने घेतलेली खबरदारी हीच आजच्या क्षणाची रामभरोसे नियमावली ठरलेली आहे. 

नौकानयनासाठी प्रशासनाकडे परवानगी अर्ज दाखल करण्याच्या एका अर्जाच्या निमित्ताने १५ वर्षे कागदातच दडून राहिलेल्या नियमावलीच्या विषयावरच तोंड फुटले आहे. दोन महिन्यांपूर्वी रंकाळा तलावात नौकानयनास परवानगी एक अर्ज दाखल झाला. त्यानंतर कागदपत्रे व नौकानयन व्यवसाय परवान्याची नियमावली तपासणी सुरू झाली. त्यावेळी ३१ जानेवारी २००३ म्हणजे पंधरा हरकती मागवण्यात आल्या.

त्यानुसार दोघा तिघांनी हरकती सुचवल्या. त्याचा विचार करून १९ जून २००३ च्या राजपत्रास नवीन नियमावलीची तयारी केली गेली; पण त्याला अंतिम प्रसिद्धीची कार्यवाहीच झाली नाही. त्यामुळे नौकानयन करताना, नौकानयन व्यवसाय करताना काय नियमावली असावी, काय खबरदारी घ्यावी, काही वाईट घडल्यास त्याची अंतिम जबाबदारी कोणाची, याची अंतिम नियमावलीच अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. आता प्रशासनाने अंतिम नियमावली जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्याची ही प्रक्रिया चालू झाली नसती तर नौकानयन खबरदारीच्या सुधारित नियमावलीशिवायच सुरू राहिले असते व एखादी दुर्घटना घडल्यावरच सगळेजण जागे झाले असते.

नियमावली सोयीची ठरणार 
नौकानयनात जसा आनंद आहे तसा काही क्षणी धोकाही आहे. त्यामुळे नौकाविहार करणारे, नौकानयन व्यवसाय करणारे या दोघांच्याही दृष्टीने नौकानयन नियमावली सोयीची ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT