Notice to 19 MLA of Shivsena in Solapur
Notice to 19 MLA of Shivsena in Solapur  
पश्चिम महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीत बंडखोरी; शिवसेनेच्या 19 नगरसेवकांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत शिवसेना उमेदवाराच्या विरोधात काम केलेल्या महापालिकेतील 19 नगरसेवकांना शहर प्रमुख हरी चौगुले यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. दरम्यान, बंडखोर उमेदवार तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांचे समर्थक नगरसेवक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. महापालिकेत शिवसेनेचे 21 नगरसेवक आहेत, त्यापैकी 19 जणांनी कोठे यांचा प्रचार केला होता.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने कोठे यांची उमेदवारी निश्चित होती. मात्र एेनवेळी कॅंाग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कोठे यांनी बंडखोरी केली व निवडणूक लढवली. त्याचा फटका बसून शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी झाली आणि त्याचा फायदा होऊन काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या. धक्कादाक म्हणजे माने यांच्यापेक्षा कोठे यांना जास्त मते मिळाली. माने यांना 29247 तर कोठे यांना 30 हजार 81 मते मिळाली.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माने यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोरांवर कारवाईची मागणी श्रेष्ठींकडे करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर काही तासांतच या नोटीसा बजावण्यात आल्या. दरम्यान, नोटीसा मिळाल्यानंतर कोठेंचा प्रचार केलेल्या काही नगरसेवकांनी मी तो नव्हेच अशी भूमिका घेतली आहे, तर कट्टर समर्थकांनी परिणामांची पर्वा नसल्याचे स्पष्ट केले आहे. शहर प्रमुखांनी दिलेल्या नोटीसीला आता हे नगरसेवक काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कोठेंच्या भूमिकेकडे लक्ष
उमेदवारी नाकारल्यावर कोठे यांनी महापालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्याचे संकेत दिले. निवडणूक कालावधीत त्यांनी निकालानंतर भूमिका निश्चित करू असे सांगितले होते. आता निकाल लागला आहे आणि शहर प्रमुखांनी नोटीसही बजावली आहे. या पार्श्वभूमीवर कोठे काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT