पश्चिम महाराष्ट्र

आता विठुरायाच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टरची सोय

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील पंढरपुरच्या विठुरायाच्या तर तुळजापुरातील भवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक ये-जा करतात. त्यामुळे पंढरपूर अथवा तुळजापूरसह बीड, जालना, परभणी या जिल्ह्यांमधील तालुक्‍यांचाही समावेश करण्यात आला आहे. विमानतळ विकास प्राधिकरणातर्फे आता भाविकांसह व्हीआयपींसाठी हेलिकॉप्टरची सोय उपलब्ध करुन दिली जाणार असून, तसा प्रस्ताव विमानतळ विकास प्राधिकरणाने तयार केला आहे.

विमानतळ असूनही मोक्‍याच्या ठिकाणी जाण्यास व्हीआयपींसह उद्योजकांना विलंब लागतो. त्यामुळे आता ज्या ठिकाणी व्हीआयपीसह अन्य नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणावर आहे, पर्यटन व औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणावर आहेत, अशा मोजक्‍या दहा तालुक्‍याच्या ठिकाणी हेलीपॅड उभारले जाणार आहेत.

सोलापुरातील होटगी रोडवरील विमानतळावर विमान, हेलीकॉप्टर लँडिंग अथवा टेकऑफची सोय आहे. मात्र, रात्रीच्या वेळी त्याठिकाणी काहीच सोय नाही. दरम्यान, महाराष्ट्रासह परराज्यातून तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी व पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. त्यावेळी व्हीआयपींचीही मोठी गर्दी असते. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील दहा ठिकाणांची निवड करण्यात आली असून, त्याच्या जागाही निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

आता त्याचा प्रस्ताव भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी यांनी दिली.

ठळक बाबी...

- व्यापार अन्‌ पर्यटन वाढीसाठी विमानतळ दूर असलेल्या ठिकाणी आता हेलिपॅडची सोय
- बीड, बुलढाणा, जालना, सोलापूरसह काही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात दहा हेलिपॅड
- हेलिपॅड, हेलिपोर्ट अथवा विमानतळ नसलेल्या ठिकाणी होणार हेलिकॉप्टर उतरविण्याची सोय
- दहा हेलिपॅडसाठी किमान 20 कोटींपर्यंत खर्च अपेक्षित : प्रस्ताव केंद्र सरकारकडे

जिल्ह्यातील विमानतळाच्या 100 किलोमीटर परिघात हेलिकॉप्टर उतरविण्याची सोय केली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा तालुक्‍यांची निवड केली असून, सोलापुरातील पंढरपूर अथवा उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरचा समावेश आहे. येथे व्हीआयपी व्यक्‍तींसह वर्षभर भाविकांची संख्या मोठी असल्याने हेलिपॅडचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

- सुरेश काकाणी, उपाध्यक्ष, विमानतळ विकास प्राधिकरण, महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT