traffic police.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आता तुम्हीच वाहतूक पोलिस व्हा..

सकाळवृत्तसेवा

सांगली-ट्रिपल सीट, नो पार्किंग, धुम स्टाईल दुचाकी चालवणे आदी वाहतुकीचे नियम मोडले जात असताना वाहतूक पोलिस तिथे नसेल तर हरकत नाही. तुम्ही सुद्धा वाहतूक पोलिसांचे कर्तव्य बजावू शकता. त्यासाठी महाट्रॅफिक ऍपचा वापर करून तुम्ही फोटो पाठवू शकता. तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि पोलिसही संबंधितांवर कारवाई करू शकतील. 


सांगली जिल्ह्यात वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादीत आहे. प्रत्येक ठिकाणी पोलिस पोहोचू शकत नाहीत. ठराविक चौकातच वाहतूक पोलिस दिसतात. त्यामुळे इतरत्र वाहतुकीचे नियम सर्रासपणे मोडले जातात. त्यामुळे नागरिकांना वाहतूक पोलिसांकडे तक्रार करावी लागते. नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिस संबंधित ठिकाणी जाऊन वाहतूक नियंत्रण करतात. राज्यातील सर्वच जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. 


वाहनधारकांना शिस्त लागावी यासाठी पोलिस दलाने "महाट्रॅफिक ऍप' ही सुविधा सुरू केली आहे. ऍपच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी वाहतुकीचा नियम मोडला जात असेल तर सामान्य नागरिकाला देखील वाहतूक पोलिसाचे कर्तव्य गोपनीयपणे पार पाडता येईल. वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो ऍपवर टाकल्यास वाहतूक पोलिसांना दंडात्मक कारवाई करणे सोईचे होईल. 


ट्रिपल सीट, धुम स्टाईल गाडी चालवणे, हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्टचा वापर न करणे, स्टॉप लाईन क्रॉस करणे, नो पार्किंगमध्ये गाडी लावणे, फॅन्सी नंबरप्लेटचा वापर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे आदी नियमांचा भंग केल्यास किंवा रस्त्यावर ऑईल सांडून अपघात होणे, ब्रेक डाऊन, धोकादायक रस्ता आदी गोष्टींची माहिती महाट्रॅफिक ऍपवर फोटो काढून पाठवता येईल. 


वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनाचे किंवा चालकाचे फोटो ऍपवर टाकल्यानंतर वाहतूक पोलिस संबंधित वाहनाची माहिती घेतील. त्यानंतर मोबाईलवर नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल संदेश पाठवला जाईल. तसेच ऍपवर तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. ऍपचा अधिकाधिक नागरिकांनी वापर करावा असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे. 


असा करा ऍपचा वापर- 
महाट्रॅफिक ऍपवर गेल्यानंतर "सिव्हिलियन रिपोर्ट' असा फोल्डर आहे. त्यामध्ये व्हायोलेशन रिपोर्ट व इन्सिडंट रिपोर्ट असे विभाग आहेत. व्हायोलेशन रिपोर्टमध्ये विविध विषयाच्या तक्रारी करता येतील. तर इन्सिडंट रिपोर्टमध्ये अपघात घडल्यास किंवा अपघाताची शक्‍यता असेल व तेथे पोलिस कर्मचारी नसेल तर फोटो काढून टाकता येईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT