One and a half lakh animals will get Aadhar card in Tasgaon taluka
One and a half lakh animals will get Aadhar card in Tasgaon taluka 
पश्चिम महाराष्ट्र

तासगाव तालुक्‍यात सव्वा लाख जनावरांना मिळणार आधार कार्ड 

रवींद्र माने

विसापूर : तासगाव तालुक्‍यातील तब्बल सव्वा लाख जनावरांना आधार कार्ड मिळणार आहे. त्यामुळे एका क्‍लिकवर जनावरांच्या लसीकरणासह विविध योजनांची माहिती शेतकऱ्याला उपलब्ध होणार आहे. इनच्या माध्यमातून शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. येत्या डिसेंबरअखेर ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे, मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ही मोहीम लांबण्याची शक्‍यता आहे. 

दुग्धपालन, खत आणि शेतीच्या कामासाठी दारात पाळीव जनावर असावे, अशी सर्वसामान्य शेतकऱ्याची अपेक्षा असते. त्यामुळे शेळीपासून ते गाय, म्हैस, बैल या जनावरांचे पालन शेतकरी करत असतो, मात्र या जनावरांच्या वर्षभरात कोणत्या साथी येतात, त्यांना कोणती लस द्यायची, याची माहिती शेतकऱ्याजवळ नसते. तसेच गाय व म्हैस गाबण गेल्यानंतर त्याची तारीख अनेकांजवळ उपलब्ध नसते. विविध शासकीय योजना व जनावरांसाठी उपलब्ध असलेले अनुदान याबाबतही बऱ्याच जणांना माहिती नसते, मात्र आता शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने पाळीव जनावरांसाठी एक मोहीम राबविली आहे. 
त्यानुसार आता प्रत्येक जनावराला आधार कार्ड उपलब्ध होणार आहे. चौकोनी बिल्यासारखे आधार कार्ड जनावराच्या कानाला कायमस्वरूपी (टॅगिंग) लावण्यात येणार आहे. हे डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना केवळ एका क्‍लिकवर आपल्या जनावराची माहिती उपलब्ध होणार आहे. 

अपुरे कर्मचारी... 
तासगाव तालुक्‍यात महाराष्ट्र शासनाची 13 व जिल्हा परिषदेचे 4 असे 17 दवाखाने आहेत, तर 2012 च्या पशुगणनेनुसार एकूण म्हशी 78 हजार 558 व गाई 40 हजारांच्या आसपास आहेत, मात्र कर्मचारी अवघे सात आहेत. त्यामुळे जनावरांचे टॅगिंग कसे होणार, असा प्रश्न आहे. दररोज किमान पन्नास जनावरांचे टॅगिंग होते. सकाळी 7 ते दुपारी बारापर्यंतच जनावरे सापडतात. तालुक्‍यातील पंचवीस हजारांच्या आसपास जनावरांचे टॅगिंग व लसीकरण झाले आहे. त्यामुळे कर्मचारी अपुरे असल्याने डिसेंबरअखेर पूर्ण कसे होणार, याबाबत मात्र अधिकाऱ्यांकडे ठोस उत्तर नाही. 

इनपच्या माध्यमातून शासनाने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. यामधून जनावरांची ओळख त्याचबरोबर लसीकरण इतर शासकीय सुविधा आता एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. कर्मचारी अपुरे आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील खासगी पशुसेवा देणाऱ्या सर्वांची बैठक घेतली आहे. त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांची मदत घेऊन हे काम लवकरच पूर्ण करू. 
- डॉ. एम. बी. गवळी, सहायक आयुक्त


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : देशात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.41 टक्के मतदानाची नोंद; महाराष्ट्रात 18.18 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT