पश्चिम महाराष्ट्र

क्रेडिट कार्डवरून पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्याला एक लाखाचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - क्रेडिट कार्डवर जमा झालेले पॉइंट बॅंक खात्यावर वर्ग करण्याच्या बहाण्याने माहिती मागवून घेत महिलेने तरुणाला १ लाख ५ हजार हजारांचा गंडा घातला. मंगळवार (ता. १८) दुपारी हा प्रकार घडला. या बाबत मनोज गोवर्धन गुप्ता (वय २९, रा. ५वा मजला, नक्षत्र हाईटस, शिवाजी पार्क) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हैदराबादच्या मेहक शर्मा नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.माहिती अशी, मूळचे मध्य प्रदेशातील उज्जेन येथील मनोज गुप्ता भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीत एरिया मॅनेजर आहेत. मंगळवारी ते कामानिमित्त कसबा बावड्याच्या दिशेने जात होते.

या रोडवरील पेट्रोल पंपावर आले असता त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. समोरून बोलणाऱ्या महिलेने आपले नाव मेहेक शर्मा असे सांगितले. नामांकित बॅंकेचे नाव सांगून क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचा दावा तिने केला. तुमच्या क्रेडिट कार्डवर ४ हजार पॉइंट जमा झाले आहेत. ते तुम्हाला वापरता यावेत यासाठी खात्यावर जमा करायचे आहेत, असे सांगून सर्व मोबाईल नंबरसह अन्य माहिती विचारली. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून घेतला. याच दरम्यान गुप्ता यांच्या खात्यातून आधी ४९९८, नंतर ७९९९ काढून घेतले. गुप्ता यांना पैसे कट झाल्याचे लक्षात आल्यानंतर फोन करणाऱ्या महिलेला याबाबत विचारणा केली. तेव्हा तुमचे कट झालेले पैसे पुन्हा खात्यावर जमा होतील असे सांगितले. तसेच खात्रीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणेही करून दिले. 

दोघांनी गुप्ता यांना बोलण्यात गुंतवून ठेवत खात्यावरील १ लाख ५ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. यानंतर  महिलेने ‘मी तुमच्यापेक्षा स्मार्ट, इंटेलिजेंट आहे’,  असे सांगत फोन ठेवला. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोसिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुप्ता यांच्या फिर्यादीवरून मेहेक शर्मा या महिलेसह तिच्यासोबत असलेल्या अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT