Nagpur Goa Shaktipeeth Highway esakal
पश्चिम महाराष्ट्र

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग वादात! 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; 805 किमीला 86,000 कोटींचा येणार खर्च

राज्यातील १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध सुरू केला आहे.

गणेश शिंदे

१२ जिल्ह्यांतील १२ हजार ५८९ इतक्या गट नंबरमधील २७ हजार ५०० एकरांतून हा महामार्ग जाणार आहे.

जयसिंगपूर : राज्यात नव्याने होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Highway) १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांतून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे हा महामार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पत्रादेवी-बांदा (ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग) ते दिगरज (जि.वर्धा) असा एकूण ८०५ किलोमीटरचा महामार्ग आहे. त्यासाठी ८६ हजार कोटी रुपयांचा खर्च आहे. १२ जिल्ह्यांतील २७ हजार ५०० एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे.

शेतकरी (Farmer) भूमिहीन होणार असल्याने राज्यातील १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध सुरू केला आहे. चार वर्षांपासून रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे (Ratnagiri-Nagpur Highway) काम सुरू आहे. अशातच राज्य सरकारने तीर्थ क्षेत्रे जोडण्यासाठी या नव्या शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी दिली आहे. रत्नागिरी-नागपूर हा मार्ग असताना नवा मार्ग मागणीशिवाय मंजूर केला आहे.

१२ जिल्ह्यांतील १२ हजार ५८९ इतक्या गट नंबरमधील २७ हजार ५०० एकरांतून हा महामार्ग जाणार आहे. या सुपर एक्स्प्रेससेवेसाठी राज्य सरकार हजारो हेक्टर जमीन राष्ट्रीय महामार्ग रिअल इस्टेट कायद्यांतर्गत जमीन संपादित केली जात आहे. महामार्गाचे भूमिपूजन २०२५ मध्ये होणार असून, २०३० मध्ये खुला होणार आहे. नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने अठरा तास लागतात. शक्तिपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येणार असल्याचे कारण सांगून सरकार नवा मार्गा उभा करीत आहे.

दृष्टिक्षेपात मार्ग

जिल्हे- १२

(वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग)

स्वरूप-६ पदरी

इंटरचेंज- २६ ठिकाणी

मोठे पूल- ४८

बोगदे- ३०

रेल्वे क्रॉसिंग-८

तीन शक्तिपीठे जोडणार

कोल्हापूर- अंबाबाई देवी

तुळजापूर- तुळजाभवानी

नांदेड- माहूरची रेणुकादेवी

महामार्गातील तीर्थक्षेत्रे

औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंग मंदिर

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर

नांदेड- गुरू गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा

सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर

सांगलीतील औदुंबर

कोल्हापूर - नृसिंहवाडी, पट्टणकोडोली, सांगवडे, कणेरी, आदमापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

Jogendra Kawade : फलटण प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारांचा पण तपास करा

World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स

Pune Traffic : पुणे शहरात येणाऱ्या मार्गांवर दुतर्फा कोंडी; सध्यांकाळी रांगा वाढल्या

SCROLL FOR NEXT