km 
पश्चिम महाराष्ट्र

दंडोबा डोंगरावर आपली शिदोरी आपलं संमेलन... लोकसाहित्याचा जागर

गोरख चव्हाण

कवठेमहांकाळ (सांगली ) : दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या तंत्रज्ञानाने प्रगती केली असली तरी हळूहळू वाचनाची गोडी कमी होत आहे.वाचनाची गोडी कायम राहावी,ग्रामीण भागातील नवोदित कवींना एक व्यासपीठ मिळावे,त्यांना लिहीत करावं आणि त्यांच्या लिहिलेल्या कविता,कथा,लेख वाचकापर्यंत सहजरीत्या उपलब्ध व्हाव्यात व तालुक्यात साहित्याची चळवळीचा जागर जोमाने सुरू करावा हेतूने कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग येथील दंडोबा डोंगरावर आपली शिदोरी आपलं संमेलन हा नाविन्यपूर्ण उपक्रम झाला. तालुक्‍यातील लेखक,कवी, कवयित्री,साहित्यिक आणि पत्रकार यांनी पुढाकार घेत उपक्रम राबवला. उपक्रमाच्या माध्यमातून नव्याने तालुक्यात कल्पकतेचा, नवसमाजनिर्मिती, लोकसाहित्याचा जागर सुरु झाला.


दिवसेंदिवस ऑनलाइन तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. यामुळे वाचनाची गोडी कमी होत आहे.तालुक्यात देशिंग, हिंगणगाव मळणगाव कवठेमहांकाळसह परिसरात साहित्य संमेलन दरवर्षी भरतात.संमेलनांमध्ये रसिक वाचकांनी सहभाग घेऊन वाचनाची गोडी लागावी या हेतूने संमेलने भरत असतात. मात्र सोशल मीडियाच्यामुळे तरुणाई दिवसेंदिवस गुतंत चालली असताना तरुणाईला साहित्याची ओढ लागावी या हेतूने तालुक्यातील साहित्यिक,लेखक,कवी, कवयीत्री व पत्रकार यांच्या पुढाकाराने दंडोबा डोंगरावर आपली शिदोरी आपलं संमेलन हा उपक्रम राबवत विचारमंथन सुरू झाले आहे.


प्रा.महादेव माळी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या संकल्पनेला तालुक्यातील लेखक आप्पासाहेब पाटील,दयासागर बंने, प्रा.अनिल पाटील,प्रा.आबासाहेब शिंदे, मनीषा पाटील,गणपत पवार,भरत खराडे, मोहन खोत,अजित पुरोहित,प्रा.सुनील तोरणे,किशोर दीपंकर, पत्रकार गोरख चव्हाण, राजाराम पाटील, विठ्ठल हुलवान यांनी साथ दिली आणि खऱ्या अर्थाने विचार मंथन सुरू झाले.गुरुवारी (ता.19) श्रीक्षेत्र दंडोबा येथे आपली शिदोरी आपले संमेलन दिवसभर झाले. संमेलनात प्रत्येकाने लोकसाहित्याची चळवळ,नवकल्पकतेचा व नवसमाज निर्मितीचा जागर सुरू ठेवण्यासाठी यापुढील काळात पुढाकार घेणार असल्याची ग्वाही दिली.संमेलनानंतर सर्वांनी एकत्र बसून वनभोजन केले.


डोंगरावरील संमेलनात प्रत्येक लेखक, कवी,कवयित्रीनी आपले लेखन, लेखनामागील भूमिका,दृष्टिकोण आणि वाचकसह तरुणाला वाचनाची गोडी लागावी यासाठी आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली.लेखक अजित पुरोहित,कवी दयासागर बनने यांनी काळाच्या ओघात लोप पावणार असलेल्या ग्रामीण भाषांचा उल्लेख केला.प्रा.अनिल पाटील यांनी भवताल पुस्तकाचे समीक्षण केले.प्रा.सुनील तोरणे यांनी डोरलं कविता, तर मोहन खोत यांनी शर्यत कविता सादर केली.यानिमित्ताने प्रथमत तालुक्यातील सर्व साहित्यिक, लेखक,कवी,कवयीत्री,पत्रकार एकत्र आल्याने तालुक्यात लोकसाहित्याचा जागर पुन्हा सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Corporation : मालेगाव मनपा निवडणुकीत ट्विस्ट! शेवटच्या दिवशी शिवसेनेची एन्ट्री, लता घोडके रिंगणात

Indigo Airlines Cancels Flights: ‘इंडिगो’ने घेतला मोठा निर्णय! २८ फेब्रुवारीपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं केली रद्द

Travel Tips For Parents: विमानात मुलांसोबत प्रवास करायचाय? मग ‘या’ 5 स्मार्ट टिप्स ठेवा लक्षात, ट्रॅव्हल होईल झकास!

Dhule ZP Schools : विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ थांबणार! धुळ्यातील १०८ जीर्ण वर्गखोल्यांवर फिरणार हातोडा

U19 World Cup: भारतीय फिल्डर्सना काय झालं? एकाच ओव्हरमध्ये सोडल्या तीन रनआऊटच्या संधी अन् मग अफगाणिस्तानच्या खेळाडूचं शतक

SCROLL FOR NEXT