over twenty two lakh cheating from Sai Prasad Group in Solapur
over twenty two lakh cheating from Sai Prasad Group in Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

साई प्रसाद ग्रुपकडून सोलापुरात 22 लाख 52 हजारांची फसवणूक 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर  : साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीने सोलापुरातील शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात येत आहे. 
साई प्रसाद फुड्‌स प्रा. लि. कंपनीचा संचालक बाळासाहेब केशवराव भापकर, वंदना बाळासाहेब भापकर, शशांक बाळासाहेब भापकर (तिघे रा. साईप्रसाद बंगलोज, सुखवणी उद्यान, पिंपरी चिंचवड, लिंक रोड, पुणे), सतीश नागनाथ चंदनशिवे, निखिल संभाजी गावडे, साई प्रसाद कॉर्पोरेशन लिमिटेडचा संचालक कुशल आदेश पचौरी (रा. ग्रेटर गंगा पनामा पिंपळ निळख, पुणे), तेजस मोहन यादव, नेहाल पांडुरंग नेणेकर, साई प्रसाद प्रॉपर्टीज लिमिटेड आणि एस. पी. किसान प्रोड्युसर कंपनी लि. चा व्यवस्थापकीय संचालक तसेच साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनी सी. ई. ओ. एस. एल. श्रीवास्तव, संजय रॉय अशी आरोपींची नावे आहेत. 

टेलर व्यावसाय करणाऱ्या लक्ष्मण परमेश्‍वर करली (वय 27, रा. न्यू सुनीलनगर, एमआयडीसी रोड, सोलापूर) यांनी फसवणुकीसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. चौकशीनंतर फौजदार चावडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 2008 मध्ये लकी चौकातील सिटी कॉर्नर चौथा मजला येथे कार्यालय सुरू केले. साई प्रसाद फुड्‌स लि., साई प्रसाद प्रॉपर्टी लिमिटेड, साई प्रसाद कॉर्पोरेशन लि., एस. पी. किसान प्रोड्युसर कंपनी लि. या नावाने कंपन्या स्थापन करून लोकांकडून आरडी योजना, फिक्‍स डिपॉझिट योजना, पेन्शन प्लॅन योजना यासह विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून घेतली. कंपनीकडून जास्त व्याजदर देण्याचे व प्लॉट देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेण्यात आली. ठरल्याप्रमाणे मुद्दल, व्याज, प्लॉट, जागा न देता तक्रारदार लक्ष्मण करली यांच्यासह सात गुंतवणूकदारांची एकूण 22 लाख 52 हजार 250 रुपयांची फसवणूक केली आहे. 

- देशातील विविध राज्यांत कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे 
- सेबीकडून कंपनी ठेवी स्वीकारण्यास निर्बंध 
- सोलापुरात 2008 पासून विभागीय कार्यालय 
- सोलापुरात शेकडो ठेवीदार असण्याची शक्‍यता 
- आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्याचे आवाहन 


सेबीकडून ठेवी स्वीकारण्यास निर्बंध घातल्यानंतरही विविध योजनांमध्ये ठेवी स्वीकारण्यात आल्या आहेत. आरोपींनी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी घेतल्या. ठेवीच्या रकमेचा अपहार केला. ठेवींची मुदत संपूनही ठेवी परत न करता फसवणूक केली. सोलापूर शहरातील साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीत ज्या ठेवीदारांनी गुंतवणूक केली आहे, ज्यांना परतावा मिळाला नाही त्यांनी पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात कागदपत्रासह हजर राहून तक्रार नोंदवावी. 
- संजय जगताप, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT