Vithu-Mauli@Pandharpur 
पश्चिम महाराष्ट्र

गणेशोत्सव2019 : विठुमाऊलीला कण्हेरीच्या फुलांची आरास

सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव : पंढरपूर : श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात कन्हेरीच्या गुलाबी रंगाच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गुलाबी फुलांच्या रंगामध्ये सजलेले विठुमाऊलीचे रुप अधिकच खुलून दिसत होते. विविध उत्सव आणि पारंपरिक सणांच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्यावतीने मंदिरात विविध फुलांची आणि फळांची आरास केली जाते. आजही गणेश चतुर्थीनिमित्त कन्हेरी फुलांची मनमोहक अशी आरास मंदिरात करण्यात आली होती. 

सध्या कन्हेरीची फुले दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे कर्नाटकातील बंगळुरुहून खास कन्हेरीचे सुमारे 100 किलो फुले सजावटीसाठी मागविण्यात आली होती. आज सकाळी फुलांच्या माळांनी विठ्ठलाचा गाभारा आणि प्रवेशद्वार सजविण्यात आले, तर रुक्‍मिणीमातेची मेघडंबरीदेखील फुलांनी सजवली होती.

विठ्ठलाचे सावळे रुप पाहण्यासाठी सकाळपासूनच मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर सकाळी 10 वाजता विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्ताने मंदिर समितीने दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कन्हेरी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. यासाठी बंगळुरु येथून 300 रुपये किलो दराने 100 किलो कन्हेरीची फुले मागवण्यात आली होती. आज कन्हेरीच्या फुलांचे महात्म्य असल्याने या फुलांचा सजावटीसाठी वापर केली आहे. 
- सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

SCROLL FOR NEXT