पश्चिम महाराष्ट्र

आष्टा येथे तलवारीने दहशत माजवणारा गजाआड

सकाळवृत्तसेवा

सांगली - आष्टा (ता. वाळवा) येथे तलवारीने दहशत माजवणाऱ्या एकास ‘गुंडा’विरोधी पथकाने गजाआड केले. उमेश जयपाल घस्ते (वय २५, साठेनगर, आष्टा) असे त्याचे नाव आहे. आष्टा येथील रत्नराज हॉटेलजवळ पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. 

अधिक माहिती अशी, की अवैध हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी ‘गुंडा’विरोधी पथकास दिले आहे. त्यानुसार पथकाचे उपनिरीक्षक शरद माळी यांच्या 
नेतृत्वाखाली खास पथक तयरा करण्यात आले आहे. पथकातील पोलिस आष्टा परिसरात गस्तीवर होते.

आष्टा येथील रत्नराज हॉटेलजवळील माऊली पान शॉप समोरील  रस्त्यावर घस्ते हा तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची  माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा  राचून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे लोखंडी तलवार मिळून आली. घस्ते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा अधिनियमनुसार आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत सागर लवटे, वैभव पाटील, संतोष गळवे, संकेत कानडे, विमल काकडे, सुप्रिया साळुंखे, किरण खोते यांचा सहभाग होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT