people get water even after filling two thousand per acre? 
पश्चिम महाराष्ट्र

एकरी दोन हजार भरूनही पाणी मिळेना, काय झाले?

सकाळवृत्तसेवा

आरग : नेहमीच दुष्काळी भागाला जीवनदायी ठरणारी म्हैसाळ योजना साडे तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली. पण, या वर्षी मिरज पूर्व भागातील शेतकरी अद्याप पाण्यापासून वंचित आहे. योजनेची एकरी दोन हजारे प्रमाणे पाणी पट्टी भरून सुद्धा पाणी न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. पाणी उशाला आणि कोरड घशाला अशा परिस्थितीमुळे पूर्व भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पूर्व भागात लोकप्रतिनिधींनी दौरा केला. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. दोन-चार दिवसांत पाणी सोडण्याची पोकळ आश्वासने देण्यात आली. पण महिना उलटला तरी अद्याप पाणी शिवारात आले नाही. गावातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली, पण अद्याप पाणी आले नाही. पाणी येणार या आशेवर शेतकरी जगत आहे. 
वाढत्या तापमानामुळे या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाई जाणवत आहे. मे महिना संपत आला तरी पाण्यासाठी घसा कोरडाच आहे.

पूर्व भागातील संपूर्ण गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी अखेर कोरड्याच राहिल्या. योजना गावाच्या दाराशी आहे. पण पिण्यासाठी पाणी नाही. भूजल पातळी खालावली. पिके करपली तसेच शेतीसाठी पाण्याची गरज आता आहे. पण पावसाळ्यात महापुराचे पाणी घेऊन काय करायचे असा सवाल आक्रमक शेतकरी करीत आहे. 

कोरोनाच्या महाभयंकर आपत्तीमध्ये येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पाणी सोडण्याची जोरदार मागणी केली जात असून पूर्व भागात दौरा केलेल्या लोकप्रतिनिधींच्याकडून फक्त बघ्याची भूमिका होत आहे. 

पूर्व भागाला कोणी वाली आहे का?
गत वर्षी मे महिना लोटला तरी पाणी सोडण्यात आले नाही. पाण्यासाठी समस्येत वाढ होत असून पूर्व भागाला कोणी वाली आहे का नाही असा सवाल आक्रमक शेतकरी करीत आहेत. होरपळलेल्या पिकांना आधार देण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी आमची आहे. 
- दाजी खोत, माजी सरपंच, लक्ष्मीवाडी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT