poisoning task from Bhide says Gaikwad 
पश्चिम महाराष्ट्र

संभाजी भिडेंकडून विष पेरण्याचे काम : गायकवाड 

सुर्यकांत वरकड

नगर: संभाजी भिडे कोरेगाव-भिमा दंगलप्रकरणातील आरोपी आहेत. परंतु, पोलिस त्यांना अटक करू शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या आश्रयाखाली भिडे समाजामध्ये विष पेरण्याचे काम करत आहेत, असे मत रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी मांडले. 

शहरातील पटेल मंगल कार्यालयामध्ये आज सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदूस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा झाली. आज सकाळी त्यांच्या सभेला परवानगी देण्यात आली होती. तर, दुसरीकडे भिडेंच्या विरोधात आंबेडकरवादी संघटनांनी एल्गार मोर्चा काढला होता. नवीन टिळक रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहापासून निघालेला एल्गार मोर्चा पोलिसांनी हॉटेल नंदवनजवळ अडवला. कार्यकर्त्यांची तेथे भाषणे झाली.

यावेळी गायकवाड म्हणाले, भिडेंनी सोलापूर, सांगली, सातारा परिसरात समाज व्यवस्थेत विष पेरण्याचे काम करून व्यवस्थेला दंश केला आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधानांबरोबर त्यांचे फोटो सोशल मीडियावर दिसतात ही दुर्दैवी गोष्ट आहे. आरोपी नगरमध्ये येवून सभा घेतो. पोलिस त्याला सभा घेण्यास परवानगी देतात, ही लाजिवाणी गोष्ट आहे. यापुढे भाजप सरकारची सत्ता येण्याचे विसरून जा ! त्याचे कंबरडे मोडल्याशिवाय कार्यकर्ते स्वस्थ बसू शकणार नाहीत. यावेळी अजय साळवे, सुरेश बनसोडे, सोमा शिंदे, सुमीत गायकवाड यांचीही भाषणे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jay Pawar: ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाहीत; जनतेला सत्य जाणून घेण्याचा हक्क, सूचक वक्तव्य करत जय पवारांची मोठी मागणी

Property Tax : मिळकतकरात वाढीचा प्रस्ताव फेटाळला; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

IND vs NED, T20 WC: नेदरलँड्सला 'गुजरात'च्या कर्णधाराची मदत! भारताची कोंडी केली; शिवम-हार्दिक जोडी संकटमोचक ठरली

School Bus Strike: परीक्षांच्या तोंडावर स्कूल बस संघटनेचा संपाचा इशारा!'या' दिवशी राज्यभर सेवा ठप्प ठेवणार, मागण्या काय?

Ajit Pawar Plane Crash: ''दादाच राहिला नाही, आता खरं-खोटं करून काय उपयोग?'' सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT