पश्चिम महाराष्ट्र

आंबा रोडवर गावठी कट्टा बाळगणाऱ्याला अटक

सकाळवृत्तसेवा

उंब्रज (कऱ्हाड) : तारळे (ता. पाटण) गावचे हद्दीतील चौकीचा आंबा रोडवर पहाटे एकजण संशयीतरित्या फिरत असताना आढळून आला. यावेळी उंब्रज पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅटेच्या आत खोचलेला एक गावठी (बंदुक) कट्टा व चार जिवंत काडतुसे असा मिळून 15 हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदर कारवाई आज मध्यरात्री 1.25 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

साहिल रुस्तम शिकलगार (वय 21 रा. नागठाणे, सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांची दिलेली माहिती अशी, तारळे ता.पाटण गावचे हद्दीत संशयीत आरोपी साहिल शिकलगार हा गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती उंब्रज पोलिसांना त्यांचा खबऱ्याकडून मिळाली होती. यावरुन मध्यरात्री 1.25 च्या सुमारास उंब्रज पोलिसांनी सापळा लावला होता. यावेळी एक संशयीत आरोपी साहिल हा चौकीचा आंबा येथे नागठाणे बाजूकडून चालत येताना दिसला यावेळी पोलीसांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो कावरा बावरा होऊन पळू लागला. यावेळी त्यास पकडून झडती घेतली असता त्याच्याकडून कमरेला पॅटच्या आत खोचलेला एक गावठी कट्टा( बंदुक) मिळून आला तर त्याच्या पॅटच्या खिशात चार जिवंत काडतुसे असा ऐवज मिळून आला.

सदर कारवाई उंब्रज पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप भोसले, हवालदार जोतीराम भुजबळ, प्रविण फडतरे, सतिश मयेकर, लक्ष्मण जगद्दने यांनी केली. यावरुन विनापरवाना शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी साहिल शिकलगार याच्यावर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप भोसले करत आहेत. संशयीतावर नागठाणे, बोरगांव याठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT