पश्चिम महाराष्ट्र

निपाणीत कडक लॉकडाऊनची सुरुवात लाठीच्या प्रसादाने; पोलिसांची कारवाई

राजेंद्र हजारे

निपाणी : दिवसेंदिवस कोरोनाचा (covid-19) संसर्ग वाढत चालला असून बाधितांसह मृत्यूची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार (lockdown) बंद ठेवले आहेत. निपाणीत कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला (nipani city) सुरुवात झाली आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यात येणार असली तरी शहरात दुचाकी व चारचाकी वाहनावर बंदी असल्याने रस्ते सामसूम दिसत आहेत. रस्त्यावर येणाऱ्या दुचाकी पोलिसांतर्फे (nipani police) जप्त केल्या जात आहेत.

निपाणी शहर व ग्रामीण भागात सोमवार (१०) पासून १४ दिवस संचारबंदी (janata curfew) असून लॉकडाऊन कडक केला आहे. त्या काळात रस्त्यावर वाहने दिसल्यास जप्तीची कारवाई केली जात आहे. प्रभारी मंडल पोलिस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ, शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक अनिता राठोड या शहरातील चौकाचौकात थांबून वाहनधारकांवर कारवाई करीत आहेत.

गेल्या आठवड्यापासून शहर आणि ग्रामीण भागात सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत किराणा दुकान व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या (immergency service) खरेदीसाठी मुभा दिली होती. त्यामुळे या काळात बाजारपेठेत जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मात्र सोमवारपासून वाहनांवर बंदी घालण्यात आल्याने सकाळी दहा वाजेपर्यंत किरकोळ नागरिकांची वर्दळ वगळता रस्ते सामसूम झाले होते.

धर्मवीर संभाजीराजे चौक, बेळगाव नाका, मुरगुड रोड, चिक्कोडी रोड, कोल्हापूर वेस, अशोकनगर आणि बाजारपेठ परिसरात वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या वाहनांची तपासणी करून नागरिकांना सोडून दितात. किरकोळ कामे व बाजारासाठी आलेल्या सर्व दुचाकी पोलिसांतर्फे जप्त करण्यात येत आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावरील वाहनांची संख्या मात्र घटलेली दिसत होती.

अनेकांना लाठीचा प्रसाद

काही वाहनधारक किरकोळ कामाच्या निमित्ताने वाहने घेऊन रस्त्यावर येत होते. त्यांना अडवून पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून समर्पक उत्तरे मिळत नव्हती. अशा दुचाकीस्वारांना लाठीचा प्रसाद देण्यासह त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यानंतर या दुचाकी संबंधितांना परत दिल्या जाणार आहेत.

दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी दहा वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. मात्र दुचाकींवर बंदी असल्याने दुकानांमध्ये ग्राहक दिसत नव्हते. त्यामुळे निर्धारित वेळेत दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT