Police with humorous humor Comedy Day Special
Police with humorous humor Comedy Day Special 
पश्चिम महाराष्ट्र

हास्य दिन विशेष : कंटाळवाण्या बंदोबस्तात पोलिसांना हास्य विनोदांची साथ 

परशुराम कोकणे

सोलापूर : बंदोबस्त... रात्रीची गस्त... तपासाकरिता दूरचा प्रवास... यात बारा-बारा तास वेळ घालवताना पोलिस अधिकारी, कर्मचारी कंटाळून जातात. ड्यूटी असल्यामुळे याला पर्यायही नाही. अशावेळी गप्पा, हास्यविनोदाची साथ मिळाली तर कंटाळा येत नाही. दिलखुलास बोलणाऱ्या, हसवणाऱ्या पोलिसांना सगळीकडे मागणी असल्याचे दिसून येते. 
प्रशासन विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त रूपाली दरेकर यांच्या कार्यालयात कार्यरत असणारे पोलिस हवालदार अनिल पाटकूलकर यांना विनोद सांगण्याची आवड आहे.

बंदोबस्त, रात्रगस्त, तपासाकरिता दूरचा प्रवास असला की हवालदार पाटकूलकरांसोबत हसतखेळत वेळ निघून जातो, असे त्यांचे सहकारी सांगतात. जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने हवालदार पाटकूलकरांनी एक विनोद शेअर केला आहे. "ट्रॅफिक हवालदार वाहतूक नियोजन करण्यासाठी चौकात उभा असतो. सिग्नल सुरू असतो. वाहनांची वर्दळ असते. त्यावेळी एका दुचाकीवर तरुण टिबलसीट जात असतात. हवालदार त्यांना शिटी वाजवून थांबवतो. लायसनची विचारणा करून तिघांना नाव विचारतो. तिघांना नावही विचारले. पहिला म्हणाला... माझे नाव राम, दुसरा म्हणाला... मी लक्ष्मण... हवालदार तिसऱ्याला म्हणतो... तुझे नाव भरत असेल! तेव्हा तिघे म्हणतात... तुम्हाला कसं माहिती? हवालदार म्हणतो, कारण मी रावण आहे, चला लंकेला..' 

पोलिस कॉन्स्टेबल सचिन गायकवाड यांनीही एक किस्सा शेअर केला आहे. ते म्हणाले, "वाढदिवसानिमित्त आम्ही पोलिस मित्र एकदा पार्टीसाठी गेलो होतो. पार्टीत छानपैकी मटणाचे जेवण झाले. जेवणानंतर आम्ही सर्वजण बाहेर फिरण्यासाठी आलो. तेथून जवळच जाळीमध्ये सात ते आठ कुत्री होती. आम्हाला पाहताच कुत्र्यांनी भुंकायला सुरवात केली. त्यातील दोन लॅब्रॉडर जातीच्या कुत्र्यांनी हिसका मारून जाळीचा दरवाजा उघडला. आम्हाला काही कळायच्या आत कुत्रे भुंकत आमच्या अंगावर धावून आले. आम्ही सर्वजण गोंधळून गेलो. पोलिस असूनही आम्हाला काही करता आले नाही. तेवढ्यात आमच्या एका सहकाऱ्याने सर्वांना खिशात हात घालण्यास सांगितले. त्याचे ऐकून सर्वांनी खिशात हात घातले. सर्वांच्या हाताला मटनाचा वास येत होता, त्यामुळे कुत्रे मागे लागले होते. खिशात हात घातल्यानंतर कुत्रे शांत झाले आणि आम्ही प्रसंगावधान राखून तेथून पळ काढला.'' हा किस्सा अनेकदा बंदोबस्तामध्ये असताना ऐकवत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT