पश्चिम महाराष्ट्र

मतदार संघात राजकीय नेत्यांची लगबग

दावल इनामदार

ब्रह्मपुरी (सोलापूर) - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी किंवा फेब्रुवारीत लागेल, असे संकेत मिळत आहेत. भाजपचे रणशिंग रविवारी (ता. २३) नागजमध्ये फुंकले. महाराष्ट्रात भयावह दुष्काळी परिस्थिति असूनही शेतकऱ्यासाठी कुटलेही नियोजन न करता भाजपचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फड़वणीस यांनी महामार्गाच्या उद्घाटनावर सपाटा लावला. आचारसहिंताच्या अगोदर 
इतर विकास कामाच्या जाहिरातीवर जोर दिला असून आश्वासनाची खैरात करीत आहे.
 शिवसेनेने पंढरपुरमधे येणाऱ्या निवडणुकीचा नारळ फोडला असला, तरी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेची गर्दीचे अंदाज फेल गेले व कार्यकर्त्याना ऊर्जा मिळाली. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आम्बेडकर यांनी होलार समाजाचा पंढरपुर येथे मेळावा घेऊन आपल्या पक्षाची ताकद वाढवून ऐन निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात वातावरण तापवत असून प्रत्येक ठिकाणी संपर्क वाढविला असला तरी कांग्रेस पक्षास घायाळ करीत असल्याचे चित्र निर्माण केले आहे.

निवडणुकीसाठी दोन महिने कालावधी असलेतरी सन २०१४ ला देशभरात मोदी लाट होती. या लाटेत सोलापूर काँग्रेसचा बालेकिल्ला नेस्तनाबूत केला तसेच  राज्यात व जिल्ह्यात भाजपने ऐतिहासिक कमळ फुलवले होते. खासदार शरद बनसोडे  हे ध्यानीमनी नसताना विक्रमी मताने खासदार झाले आणि बदलत्या राजकीय प्रवाहात ते जिल्ह्याच्या  विराजमान झाले.  

या काळात त्यांनी  राज्यात व केंद्रात सत्ता असूनही आपल्या मतदार संघात म्हणावा तसे विकास करता आला नाही त्यामुळे पक्षातून नाराजी उमटली, तक्रारी झाल्या, स्थानिक भाजप पक्षाचे गट तट पाहवयास मिळाले व सोलापूर जिल्ह्यात दोन देशमुख मंत्री असूनही विकास करण्यास चालना मिळाली नाही परंतु, येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कोण अशी राजकीय चर्चा होत आहे.

दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणुका जशा जवळ येतील त्यापद्धतीने जिल्हाभर दौरे मतदार संघात सुरु केली असून जरी पक्षाने संधी दिल्यास मी निवडणुकीस तयार आहे असे प्रसारमाध्यमाशी बोलून दाखवले त्यामुळे चार वर्षा मध्ये कुठल्याही प्रकारचे काँग्रेस पक्षाने पक्ष वाढीसाठी असे काही धोरणे न करता ऐन निवडणुकीसाठी जोर दिला असून प्रत्येक तालुकानिहाय गाठी भेटी, दुष्काळी पाहणी दौरे, लग्न समारंभ, उदघाटन या मधून मतदार पर्यंत संपर्क साधत असून चार वर्षानंतर गाठी भेटीतच पक्षाच्या कार्यकर्त्याच्या निवडी करण्यात आल्या परंतु काँग्रेस पक्षांमधील समन्वय मुळे पक्ष विस्कळीत झाला असून पक्षाचे कोणालाही घेणे देणे नसून निवडणुकीच्या तोंडावर निवडी करून काय साध्य करणार आहे असे  जनता कुजबुज करू लागली आहे तसेच राष्ट्रवादी पक्षाने बूथ निहाय पक्ष बांधणीस जोर दिला असलेतरी गट तट निर्माण झाले असून निवडणुकीत जाचक ठरणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश मतदार संघात  आमदारानी आप-आपल्या गटाची ताकद निर्माण करून पक्ष वाढीस न लक्ष देता कामे कसे होईल यावर जोर दिला गेला त्यामुळे भविष्यात गटाची ताकदीवर तिकीट मिळेल असे त्यांना राजकीय नेत्यांना वाटू लागले आहे. निवडणुका जशा जवळ येतील राजकीय नेत्यांच्या दौरे वाढले आहेत. आतापासूनच निवडणुकीची जोराची तयारी केली असून, आश्वासनाची बरसात करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीत ‘पुन्हा दिल्ली’चा मार्ग सुकर कोण करणार ? याकडे विशेष लक्ष असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT