किल्लेमच्छिंद्रगड : प्रदूषित पाण्याचा पिण्यासाठी सतत वापर झाल्याने येथे गंभीर आजाराच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या पाच वर्षांपासून गावविहिरीत जलसिंचन योजनेचे पाणी मिसळून पिण्यासाठी पुरवले जाते. मात्र प्रक्रिया न केलेले जलसिंचन योजनेचे पाणी व शेतजमिनीतील क्षारयुक्त पाणी पाझरून प्रदुषित झालेले विहिरीचे पाणी यामुळे समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. गावासाठी लवकरात लवकर शुद्ध पाण्याचा पुरवठा गेला जावा अशी मागणी आहे.
एक वयस्क व तरूण अशा वयोगटातील दोघांचा मृत्यूही झाला आहे. वृद्ध ऐंशी वर्षीय तर तरुण तीस वर्षीय आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे झालेल्या त्रासामुळे एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अनेक वर्षे गावाला पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही. प्रश्न जुनाच पण उपाययोजना नव्याने काहीच होत नसल्याने शासन स्तरावरून दुर्लक्ष झाले आहे. नागरीकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतकरी अधिक उत्पन्नासाठी खत म्हणून मळी तसेच मळी मिश्रित पाण्याचा वापर करीत आहेत. मळीतील अर्क आणि मळी मिश्रित दूषित सांडपाणी पिकासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यासोबत जमिनीत जिरते. सपकाळ खोरी, सय्यद-आगा मळा, कणसे मळा परिसरातील सर्व विहीर, कूपनलिकेचे पाणी खराब झाले आहे. पाण्याला तांबूस गंर आला आहे. दुर्गंधीही येत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळणे बंद झाले आहे. पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी साखर कारखान्यांनी दिलेले जलसिंचन योजनेचे पाणी गाव विहिरीत सोडले जाते. जलसिंचनचे नदीचे आणि विहिरीचे प्रदूषित पाणी एकत्र करून ते पिण्यासाठी वापरले गेल्याने गावाचेच आरोग्य धोक्यात आले आहे.
कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पापामुळे, तसेच शेतशिवारात मळी मिश्रित पाणी सोडल्याने भूगर्भातील पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. प्रदुषण नियंत्रण विभागाकडे तक्रारी केल्या तरी दखल घेतली जात नाही. वेळीच दखल घेवून प्रदूषण रोखले असते तर मृत्यू रोखता आले असते. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून गाव शिवारातील पाणी प्रदुषणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी.
- राहुल निकम, उपसरपंच, किल्लेमच्छिंद्रगड.
रानामाळातील विहीरीचे पाणी प्रदुषणाने खराब झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रानातील विहीरीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर केल्यास आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. पिण्यासाठी नियमित तपासणी होत असलेल्या पाण्याचा वापर करावा. गावात येवून पाहणी केली असता नवीन रुग्ण आढळून आलेले नाहीत.
- डॉ. प्रकाश वाठारकर आरोग्य अधिकारी, प्रा. आ. केंद्र, येडेमच्छिंद्र
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.