Pomegranate growers do not get insurance cover due to oppressive conditions 
पश्चिम महाराष्ट्र

जाचक अटींमुळे डाळिंब उत्पादकांना विमा भरपाई नाही 

नागेश गायकवाड

आटपाडी : डाळिंबाला अतिवृष्टीचा तडाखा बसूनही विमा कंपनीने बदललेल्या जाचक निकषांमुळे तालुक्‍यात दहा हजारावर डाळिंब उत्पादक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहणार आहेत. शेतकरी विम्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. 

आटपाडी तालुक्‍यात सन 2020 मधील पावसाळ्यात 40 वर्षातील विक्रमी पाऊस झाला. तीन वेळा 100 मिलिमीटरवर एकाच वेळी पाऊस झाला. विक्रमी एक हजार मिलिमीटर पावसाची नोंद तालुक्‍यात झाली. बहुतांश ओढे, माणगंगा नदीला पूर आला. अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले. अतिवृष्टीचा डाळिंबासह खरीप, रब्बी पिकांना फटका बसला. डाळिंब उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. 90 टक्के शेतकऱ्यांचा खर्चही निघाला नाही. 

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पावसातील खंड यामुळे नुकसान झाल्यास आधार मिळावा म्हणून दहा हजारावर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंब, तर पंधरा हजार हेक्‍टर क्षेत्राचा खरीप पिकाचा विमा भरला आहे. साहजिकच अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांचे लक्ष विमा भरपाई कधी मिळणारे याकडे लागले आहे. मात्र अद्याप भरपाई मिळणार असल्याची कसलीच घोषणा जाहीर झालेली नाही. 

दुसरीकडे विमा कंपनीने या वर्षी पहिल्यांदाच निकषात बदल करून शेतकरी विमा भरपाई मिळण्यासाठी पात्र ठरू नये यादृष्टीने जाचक अटींचा समावेश केला. त्यामुळे 25 वर्षात पहिल्यांदाच प्रचंड नुकसान होऊनही डाळिंब उत्पादक भरपाई मिळण्याला पात्र ठरणार नाहीत. विमा कंपनी सोबत मंत्री, लोकप्रतिनिधींच्या बैठकाही झाल्या. मात्र कंपनीने भरपाई देण्याविषया हात वर केले. विमा भरपाई मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे. ते केव्हाही रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेत आहेत. 

बुधवारी बैठक :
माणगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांनी डाळिंब विम्यासाठी बुधवारी (ता. 17) कृषी विद्यालयावर शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत विमा मिळविण्याच्या दृष्टीने विविध टप्प्यातील आंदोलनाचे नियोजन केले जाणार आहेत. मोठ्या संख्येने शेतकरी बैठकीला उपस्थित राहिल्यास तीव्र आंदोलन केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

Ashes Test: पुन्हा राडा! ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अम्पायरला घेरले; मिचेल स्टार्कचे वादग्रस्त विधान स्टम्प माईकने टिपले, Viral Clip

Latest Marathi News Live Update : पुणे काँग्रेसभवन मध्ये इच्छुकांची मोठी गर्दी

Bank Holiday : आजपासून 5 दिवस देशभरातील बँका बंद! राज्यातील बँकाही 4 दिवस बंद; कधी ते जाणून घ्या?

विदर्भाचे दोन्ही पोट्टे IPL मध्ये चमकणार! SRH-Mumbai Indians कडून उतरणार मैदानात, विदर्भाच्या क्रिकेटचा नवा अध्याय!

SCROLL FOR NEXT