brahmapuri
brahmapuri 
पश्चिम महाराष्ट्र

प्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर 

दावल इनामदार

ब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक वेगळ्या प्रकारची घटना असून सीआयडी कड़े देऊन शिवशरण कुटूंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून सर्वोत्परी लवकर मदत करेन असे आश्वासन भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

प्रतिक हत्या प्रकरण घटना घडून दोन आठवडे कालावधी गेला. तरीही पोलिसाचा पथकाचा तपास सुरू असून मारेकरीचा अद्यापही शोध लागला नसल्याने ही अंत्यत गंभीर प्रकारची घटना असून या घटनेचे फॉरेन्सिक लॅब, फिंगर प्रिंट, कुठल्या प्रकारची तपासणीची केली याची माहिती पोलीस अधिक्षका कडून घेऊन शासनाकड़े सादर करणार आहोत प्रतिकच्या हत्येने दुखात असलेल्या शिवशरण कुटूंबाची भेट घेवून सांत्वन केले व  शासनास आर्थिक मदतीची मागणी  करेन. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी, भारिप चे अशोक माने, धनाजी सरवदे, लक्षमण गायकवाड़, नवनाथ महाराज, राजीव बाबर, अर्जुन सलगर, विष्णु शिंदे, नाना कदम, शिवाजी बनसोडे, अंकुश शेवड़े, सिद्धार्थ लोकरे, जनार्दन शिवशरण व माचणूर परिसरातील जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले पोलिस अधीक्षक यांच्याकड़ूंन घटनेची माहिती घेऊन तपासात का विलंब होत आहे. प्रतिक हत्या प्रकरण गंभीर प्रकारची असून ह्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल.

याघटनेसंबधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सदर घटनास्थळीची माहिती देऊन लवकरात लवकर आरोपींना अटक करूण या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. मारेकऱ्या च्या अटकेसाठी सीआयडी चौकशी करुण या प्रकरणात पोलीस प्रशासनाने हलगर्जि केला असेल तर त्यांना निलंबित करण्यात येईल. तसेच यावेळी माचणूर, जिल्हा परिसरातील जनतेने या निर्घ्रुण हत्येचा तपास सीआयडी व सीबीआ कडे सोपवून त्वरीत मारेकऱ्यांचा अटक करावी, अशी मागणी भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

SCROLL FOR NEXT