karhad 
पश्चिम महाराष्ट्र

तब्बल ४७ वर्षांनी उंडाळकर गटाकडुन पृथ्वीराज चव्हाण गटाचा सत्कार 

हेमंत पवार

कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव-पाटील 
उंडाळकर गटाचा राजकारणातील तब्बल 47 वर्षांचा टोकाचा संघर्ष कार्यकर्त्यांनी जवळुन अनुभवला आहे. मात्र राजकारणामध्ये कोणीही दिर्घकालाचा शत्रु नसतो या उक्तीप्रमाणे या दोन्ही गटांचे मलकापुर पालिकेच्या निवडणुकीत मनोमिलन झाले. दोन्ही गटांनी एकत्र येत तेथे सत्ताही मिळवली. त्यानंतर कालच उंडाळकर गटाने अॅड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखील मलकापुर पालिकेच्या नवनिर्वाचीत नगराध्यक्षा आणि नगरसेवकांचे सत्कार केले. त्यामुळे उंडाळकर गटाकडुन तब्बल 47 वर्षानंतर बाबा गटाचा झाला. 

हा सत्कार  बदलती राजकीय समिकरणे आणि उंडाळकर -चव्हाण गटाचे वैर सध्यातरी संपल्याचेच अधोरेखीत करत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तो सत्कार चर्चेचा विषय ठरला आहे. 

माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांना त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यापासुन त्यांना राजकीय वारसा आहे. खासदार, केंद्रीयमंत्री आणि गांधी घराण्याशी जवळीक असणारे कुटुंब म्हणुन चव्हाण घराण्याकडे पाहिले जाते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवुन पृथ्वीराज चव्हाण यांनीही खासदार, केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री म्हणुन काम केले. त्यावेळपासुन त्यांचा गट राजकीय पटलावर सक्रीय आहे. त्यानंतर राज्यात काँग्रेस सरकारला अडचणींच्या प्रसंगांना सामोरे जावे लागल्यावर सोनिया गांधी यांनी चव्हाण यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचीही जबाबदारी दिली. त्यामुळे पुन्हा त्यांचा गट चार्ज होवुन सक्रीय झाला. तर १९७२ पासुन माजी मंत्री उंडाळकर हे राजकारणात सक्रीय झाले. 

टप्याटप्याने त्यांनी जिल्हा परिषदेपासुन आमदार, मंत्री होण्यापर्यंत मजल मारली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांनी ३५ वर्षे सलग सातवेळा आमदार होण्याचाही मान पटकावला. या दरम्यानच्या काळात त्यांचा कायमच चव्हाण गटाशी संघर्ष राहिला. त्याचे सर्वच साक्षीदार आहेत. अॅड. उदयसिंह पाटील यांना एका प्रकरणात अटक झाल्याच्या कठीण काळातही उंडाळकर यांनी परिस्थितीशी दोन हात केले. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या विरोधात कऱ्हाड दक्षिणमधुन विधानसभेची निवडणुक लढवली. त्यामध्ये उंडाळकरांना विजय मिळाला नसला तरी त्यांनी त्यांचा गट त्यानिमीत्ताने चार्ज केला. विधानसभेनंतर मात्र भोसले गटाला रोखण्यासाठी मलकापुर पालिकेच्या निवडणुकीत उंडाळकर आणि चव्हाण गटांच्या मनोमिलानास प्रत्यक्षास सुरुवात झाली आणि दोन्ही गट एकत्र आले. त्यामध्ये त्यांना विजयही मिळाला. त्याप्रित्यर्थ उंडाळकर गटाने मागील राजकीय वैर बाजुला ठेवुन अॅड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण गटाच्या नवनिर्वीचीत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार घेवुन राजकीय उंडाळकर आणि चव्हाण गटाचे वैर सध्यातरी संपल्याचीच चुणुक दाखवली. हा सत्कार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Rewards World Cup Winners : महाराष्ट्र सरकारकडून वर्ल्डकप विजेत्या स्मृती, जेमिमा अन् राधा यांना बक्षीस स्वरूपात मोठी रक्कम!

Ajit Pawar discussion with Fadnavis : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण ; अजितदादा मुख्यमंत्री फडणवीसांना नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: सोमवार पेठेतील हॉटेलमध्ये आगीत तरुणाचा मृत्यू

Palghar Crime : दारू पिऊन बापाने घातला धिंगाणा, अल्पवयीन मुलाने डोक्यात मुसळ घालून केलं बापाला ठार; पालघरमधील मोखाड्याची घटना!

Pune Crime : लोणी काळभोर पोलीसांनी घातपाताचा कट केला उघड; ३ जण कोयत्यांसह घेतले ताब्यात!

SCROLL FOR NEXT