ShivendraRaje  
पश्चिम महाराष्ट्र

प्रतिपंढरपूर करहर नगरीत विठ्ठलभक्तांच्या उत्साहाला उधाण; शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते विठुरायाची पूजा

महेश बारटक्के

कुडाळ - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिपंढरपुर करहर ता.जावळी येथे विठुरायाची महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. सातारा जावळीचे भाजपाचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते तसेच जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे व माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली.

आज आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच आषाढी एकादशी! या उत्सवानिमित्त दरवर्षी प्रतीपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या करहर ता. जावली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करहरनगरीत विठुरायाची आजची महापूजा भक्तीभावाने संपन्न झाली.

करहर येथील विठ्ठल मंदिरात सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ही महापूजा पार पडली. यावेळी करहर येथील तीन वारकरी दाम्पंत्यांनाही विठुरायाच्या पुजेचा मान देण्यात आला. यावेळी तहदिलदार हणमंत कोळेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर, जावळी - महाबळेश्वर बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, मेढा पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर,

करहरच्या सरपंच सैा. सोनाली यादव, उपसरपंच प्रदीप झंडे , ग्रामस्थ प्रसाद यादव, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पुजारी संतोष खिस्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

धार्मिक पूजेनंतर मंदिरात भाविक भक्तांना सुरवात झाली. यावेळी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य लाभो अशी प्रार्थना विठ्ठल- रुक्मिणी चरणी केली. तसेच तमाम विठ्ठलभक्त आणि वारकरी बंधू- भगिनींना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची रांग लागली असून त्याकरिता रांगेत दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये महिला आणि पुरुष भाविकांना दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा मधून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दुपार नंतर काटवली, बेलोशी, दापवडी या दिशेने पालख्या येत असतात. त्याच वेळी कुडाळ, सोमर्डी, बामणोली, शेते, करंदी, येथून सुद्धा पालख्या आणि पारंपरिक वेशभूषा केलेल्या दिंड्या येतात. बस स्थानकावर हे वारकरी दिंड्या एकत्र आल्याने विठ्ठल नामाचा जयघोष करीत रिंगण सोहळा रंगतो, ते पहाण्यास यावेळी प्रचंड भाविकांची गर्दी होते. तर काही सामाजिक दृष्यावर चित्र रथ लक्ष वेधून घेतात. मेढा पोलिस स्टेशन च्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यावेळी विविध सामाजिक संस्थांच्या व राजकीय पक्षांच्या वतीने जागोजागी अल्पोहर फळे, खिचडी, या उपवासच्या पदार्थाचे वाटप करण्यात येत आहे तसेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

School Rules: शिक्षकांना करता येणार नाही विद्यार्थ्यांच्या रील, शिक्षण विभागाची नवी नियमावली

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अजित पवारांच्या विरोधात बॅनरबाजी

Nashik Municipal Election : सिडकोत निकालाचा थरार! भाजपचे दुबार एबी फॉर्म प्रकरण गाजले; ५ जणांची उमेदवारी फेटाळली

Car Launch in 2026 : एकच झलक, सबसे अलग! 2026 वर्षांत लॉंच होणार 10 ब्रॅंड कार; परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स

SCROLL FOR NEXT