Preparing to start the cycle of "Mahisal" in 10 days
Preparing to start the cycle of "Mahisal" in 10 days 
पश्चिम महाराष्ट्र

"म्हैसाळ' चे आवर्तन 10 दिवसांत  सुरू करण्याची तयारी

विष्णू मोहिते

सांगली : मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्‍याच्या दुष्काळी भागासाठी तातडीने म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. आवर्तन 10 दिवसांत सुरू करण्याची तयारी पाटबंधारे विभागाने सुरू केली आहे. ग्रामपंचायत, शेतकऱ्यांनी तातडीने पाण्याची मागणी नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 

मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्‍यातील दुष्काळी जनतेसाठी तातडीने म्हैसाळ योजना सुरू करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह मिरज पंचायत समितीचे सभापती अनिल आमटवणे यांनी जलसंपदा विभागाला केली आहे. दुष्काळी तालुक्‍यांतून टॅंकरची मागणी होईल. विहिरी, नाले, ओढे आटू लागल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला. या पार्श्‍वभूमीवर म्हैसाळ योजनेच्या पाण्याची आठवड्यात सुरू होण्याची नितांत गरज भासणार आहे. 

पाटबंधारेला शेतकऱ्यांनी तातडीने मागणीची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे मंगळवारअखेर 50 हजार एकर मागणी अपेक्षित असताना केवळ एक हजार एकर मागणीच आली आहे. दहा ग्रामपंचायतींनी पाण्याची मागणी केली आहे. शेतकरी विहिरींचे सर्व पाणी आटल्यानंतर जागे होतात. शेतकऱ्यांनी पाण्याचा अंदाज घेऊन तातडीने मागणी नोंदवावी, अशी पाटबंधारेची अपेक्षा आहे. 

पूर्व भागातील शेतकरी जलसंपदाच्या नियमानुसार 81ः19 प्रमाणात पाण्याचे पैसे भरण्यास तयार आहेत. या पैशाची वसुली करून यंत्रसामग्रीची किरकोळ दुरुस्ती करण्यासह येथील अन्य कामे करण्यास वेळ लागणार असल्याने ही योजना सुरू होण्यास किमान आठ-दहा दिवस लागतील. आत्तापासूनच पाणीपट्टी वसूल करण्यासह किरकोळ दुरुस्तीची कामे जलसंपदा विभागाने करावीत, अशी अपेक्षा आहे. 

म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी अद्याप शेतकऱ्यांकडून हवी तशी मागणी आलेली नाही. किमान ग्रामपंचायतीकडून तरी मागणी अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनीही तातडीने मागणी नोंद करावी. दहा दिवसांत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल. 
- सूर्यकांत नलवडे, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ सिंचन योजना. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT