Money Lender sakal
पश्चिम महाराष्ट्र

Private Money Lender : वाळवा तालुक्यात खासगी सावकारांची संख्या वाढतीच

वाळवा तालुक्यात परवानाधारक सावकारांची संख्या कमी; पण खासगी सावकारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

पोपट पाटील

वाळवा तालुक्यात परवानाधारक सावकारांची संख्या कमी; पण खासगी सावकारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

इस्लामपूर - वाळवा तालुक्यात परवानाधारक सावकारांची संख्या कमी; पण खासगी सावकारांच्या संख्येत वाढ झाली आहे. आर्थिक परिस्थिती सुधारताच शिल्लक पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक न करता ते अव्वाच्या सव्वा व्याजदराने देण्याकडे काही नागरिकांचा कल वाढला आहे. १० ते २० टक्के दराने व्याजाची वसुली केली जात आहे. यातूनच या पैशांच्या वसुलीसाठी धमकी देण्याचे प्रकार वाढले आहेत. याला संबंधितांनी आळा घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहेत.

वाळवा तालुक्यात शासनाकडे नोंद असलेले ८० सावकार कार्यरत आहेत. त्यांना रीतसर सावकारीचा परवाना शासनाने दिलेला आहे. यापूर्वी ही संख्या ६५ होती. यातील काहींनी नूतनीकरण करून घेतले आहे. परंतु विनापरवाना सावकारांची संख्या एक हजारांवर आहे. त्यांची आर्थिक उलाढालही लाखो रुपयांत आहेत.

कमी-अधिक पाऊस, बँकांच्या खेटा, कर्जासाठी जाचक नियम-अटी आणि बहुतांश शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडतात. यातून बाहेर पाडण्यासाठी ते सावकारांच्या दारात जातात. याचाच गैरफायदा उठवत सावकार जादा दराने व्याजाची वसुली करतात. अडचणीत सापडलेल्यांना पैसे देऊन नंतर त्याला लुबाडूनच व्याजाची वसुली केली जात आहे.

शहर व ग्रामीण भागातील बडी हस्ती अधिक व्याजाच्या हव्यासापोटी आपल्या हस्तकाद्वारे बाजारात पैसे वाटप करीत आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेले सावज हेरून संधीचा गैरफायदा घेतला जात आहे. नागरिकांनी त्याला बळी न पडता योग्य पर्याय शोधावा. वाळवा तालुक्यात जानेवारी २०२२ ते मे २०२३ पर्यंत अवैध सावकारीबाबत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सावकार परवाना असा मिळतो...

  • उपनिबंधक कार्यालयात अर्ज केल्यास अवघ्या ५०० रुपयांत सावकारीचा परवाना मिळतो.

  • तालुक्यासह ग्रामीण भागात सावकारांकडून सरासरी १० टक्के दराने व्याजाची वसुली केली जाते. मात्र, कधी-कधी जादा पैशांची वसुली केली जाते.

  • सहकार विभागाकडून सावकारीचा परवाना दिला असला तरी त्यामध्ये निर्धारित रकमेहून अधिक जादा वसुली केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाते.

  • खटला दाखल झाल्यानंतर पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

निर्धारित रकमेपेक्षा जादा रक्कम वसुली केल्याचे आढळल्यास त्या सावकारावर कारवाई करून त्याचा परवाना बंद करण्यात येतो. विनापरवाना सावकारी केल्याचे तपासाअंती सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. कोणाची जादा व्याजासाठी पिळवणूक होत असल्यास त्यांनी जिल्हा निबंधक कार्यालयात तक्रार दाखल केल्यास त्या सावकारास पाच वर्षे शिक्षेची तरतूद आहे.

- रंजना बारहाते, सहायक निबंधक, उपनिबंधक कार्यालय, इस्लामपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT