teacher1.jpg
teacher1.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

प्राध्यापकांनो, सुट्यातही करा काम 

तात्या लांडगे

सोलापूर : सप्टेंबर अखेरीस प्राध्यापकांनी राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन केले. त्या काळातील शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी येत्या 14 ऑक्‍टोबर ते 13 नोव्हेंबर या काळातील सुट्ट्यांच्या दिवशीही प्राध्यापकांना काम करावे, असे निर्देश उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी महाविद्यालयांना दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर वेळापत्रक तयार करण्यासाठी विद्यापीठांकडून संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना लेखी पत्रे दिली आहेत. 

;''ऐन सणासुदीत या नव्या आदेशामुळे संपात सहभागी झालेल्या प्राध्यापकांनाअतिरिक्‍त तास घेण्याकरिता महाविद्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक सर्व महाविद्यालयांनी तयार करावे आणि त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावा.'', असे आदेश सहसंचालकांनी दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालय, प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधला जात आहे. 5 नोव्हेंबरला धनत्रयोदशी असून त्यादिवशीही तास घेतले जाणार आहेत. 

अतिरिक्‍त तासिकांचे नियोजन 
प्राध्यापकांनी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर या कालावधीत राज्यव्यापी कामबंद आंदोलन केले होते. त्यावर सरकारने बैठक घेऊन लेखी आश्‍वासन दिले आणि 15 दिवस चाललेला हा संप मागे घेण्यात आला. मात्र, 14, 21, 28, 29, 30 व 31 ऑक्‍टोबर आणि 1, 2, 3, 4 व 11, 12, 13 नोव्हेंबर या कालावधीत प्राध्यापकांना अतिरिक्‍त तास घ्यावे लागणार आहेत. सुटीच्या दिवशी पूर्णवेळ तास चालणार आहेत. 

प्राध्यापक संघटनांकडून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना संप काळात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याबाबत पत्र दिले आहे. त्यानुसार विद्यापीठाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्रव्यवहार केला असून त्यानुसार नियोजन करून तास घेतले जात आहेत. 
- डॉ. व्ही. बी. पाटील, विशेष कार्यासन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT