पश्चिम महाराष्ट्र

जवानांबद्दल अभिमान अन्‌ चिंताही! 

सकाळवृत्तसेवा

सातारा  - अपशिंगे... नव्हे तर मिलिटरी अपशिंगे....! शेकडो युवक लष्करात अन्‌ त्याहून जास्त घराघरांत निवृत्त लष्करी अधिकारी व जवान असलेले सातारा जिल्ह्यातील गाव. देशाच्या सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीने लष्करी सेवा नसानसात भिनलेल्या या गावातही युद्धस्य कथा रंगत असून निवृत्त जवानांबरोबरच युवकांतही भारतीय जवानांच्या पराक्रमाच्या चर्चा झडत आहेत. 

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर अतुलनीय शौर्याची झलक दाखवत भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथे उद्‌ध्वस्त केलेले दहशतवाद्यांचे तळ, पाकची पाडलेली विमाने या शौर्याच्या बातम्यांवर चर्चा करतानाच फायटर जेट पडल्याने पाक लष्कराच्या ताब्यात गेलेल्या हवाई दलाचे अभिनंदन वर्मा यांच्याबद्दल वाटणारी चिंता अन्‌ युद्धाला तोंड फुटल्याच्या बातम्यांचीच चर्चा सामान्यांत होताना दिसते. सातारा जिल्ह्यातील अपशिंगे हे लष्करी सेवेबाबत प्रसिद्ध असलेले गाव. या गावात फेरफटका मारला तरी पावलोपावली निवृत्त जवान भेटतात. अनेक तत्कालीन जवान आता वृद्धत्वाकडे झुकले आहेत. दैनंदिन कामे केल्यानंतर हे जवान मंदिर, निवृत्त जवानांच्या कार्यालयात तसेच गावातील अमर जवान स्मारकात निश्‍चितच एकत्र आलेले आढळतात. त्यांच्यातही या युद्धाच्या चर्चा घडतात. प्रत्येकाच्या तोंडून भारतीय जवानांबद्धल आणि एकूणच देशाच्या लष्करी ताकदीबद्धलचा अभिमान आजही डोकावत होता. 

सध्या लष्करी सेवेत येथील चारशेशेहून अधिक जण विविध पदांवर कार्यरत आहेत. तर तेवढेच किंबहुना त्याहून जास्त निवृत्त जवान आहेत. लष्करात कोणी नाही किंवा नव्हते, असे येथे एकही घर आढळणार नाही. 1914 च्या महायुद्धापासून येथे लष्करी सेवेची आणि पराक्रमाची परंपरा आहे. एकही युद्ध असे नाही की, त्या युद्धात येथील जवानांनी पराक्रम गाजवला नाही. अनेकांनी हौतात्म्यही पत्करले आहे. शौर्याची अन्‌ लष्करी सेवेची परंपरा आजही जपत असलेल्या युवकांचे एकच लक्ष असते, ते लष्करी सेवेत दाखल होण्याचे. 

एकाच कुटुंबातील 17 जणांकडून लष्करी सेवा 
अपशिंगे येथील निवृत्त (रिटायर्ड) सुभेदार निवृत्ती दगडू निकम यांच्या कुटुंबातील एकूण 17 जणांनी लष्करी सेवा बजावली आहे. पाच भाऊ, सात मुले आणि पाच नातवंडांचा त्यामध्ये समावेश आहे. या 17 पैकी सध्या सहा जण लष्करी सेवेत कार्यरत आहेत. 

आमच्या घरातील चार जणांनी लष्करी सेवा बजावली आहे. दोघे निवृत्त झालेत, तर दोघे लष्करी सेवा बजावत आहेत. लष्करी सेवेच्या परंपरेचा आम्हाला अभिमान आहे. 
- संपतराव निकम, निवृत्त जवान

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

Vishal Patil: विश्वजीत कदमच आमचे नेते त्यांना मुख्यमंत्री करणारच, विशाल पाटलांनी सांगितला विजयानंतरचा प्लॅन

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात १६ नेत्यांना नोटीस, सात राज्यांमध्ये पोलिस पोहोचले

Shahrukh Khan : शाहरुखवर अबराम भडकला ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

SCROLL FOR NEXT