Radhakrishna Vikhe Patil is preparing to resign from Congresss Opposition Leader Post
Radhakrishna Vikhe Patil is preparing to resign from Congresss Opposition Leader Post 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : राजीनामा देण्याच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हालचाली

मुरलीधर कराळे

लोकसभा 2019 
नगर : मुलगा डाॅ. सुजय भाजपमध्ये गेल्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता असून, तशा हालचाली सुरू झाल्याचे समजते. 

पुत्रप्रेमापोटी त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा काॅंग्रेसला मिळण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. मुलगा भाजपमध्ये आणि आई-वडील काॅंग्रेसमध्ये हा विरोधाभास, प्रचार करताना टीका कोणावर करायची हा मोठा प्रश्न, आदींमुळे ते विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते. दरम्यान, असे झाल्यास ते लवकरच भाजपवासी होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डाॅ. सुजय यांनी वडीलांचेही ऐकले नाही. भाजपमध्ये जावून वडिलांनाही अडचणीत आणले, असे राज्यभर चर्चिले जात आहे. देशभर भाजपचा वरचष्मा असताना राज्यात काॅंग्रेस टिकविण्यासाठी, वाढविण्यासाठी विखे यांनी केलेले प्रयत्नही सर्वश्रूत आहेत. सुजय विखे यांच्या आघाडीकडून उमेदवारीसाठी राधाकृष्ण विखे यांनी अनेक दिल्ली वाऱ्या केल्या. सोमवारी काॅंग्रेसच्या वरिष्ठांच्या बैठकीत महाराष्ट्रामधून विखे पाटील व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते. यावेळी विखे यांनी पक्षाचे वरिष्ठ अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेवून त्यांना या उमेदवारीबाबत विनंती केली. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे मन वळविण्याचा राहुल गांधी यांना प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते. परंतु या प्रयत्नाला त्यांना यश आले नाही. त्यामुळे विखे काॅंग्रेसवरही नाराज झाले.

काॅंग्रेसने त्यांना विरोधीपक्षनेतेपद दिले. पत्नीला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. असे असताना विखे असे का वागतात, अशी टीका काॅंग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब यांनी केली होती. ही प्रतिक्रिया काॅंग्रेसजनांना भावली. या सर्व घडामोडींमध्ये काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आपले ऐकले नाही, अशीच काहीसी भावना विखे कुटुंबाची झाली. त्यातूनच ते विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितल्याचे समजते. असे झाल्यास विखे लवकरच भाजपवासी होऊ शकतात, या शक्यतेला पुष्टी मिळत आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असेही बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT