Radhakrishna Vikhe as president of the Vikhe factory 
पश्चिम महाराष्ट्र

विखे कारखान्याच्या अध्यक्षपदी  राधाकृष्ण विखे; कडू उपाध्यक्ष 

सकाळ वृत्तसेवा

लोणी ः पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची आणि उपाध्यक्षपदी विश्वास कडू यांची एकमताने निवड झाली. 


विखे कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. या निवडणुकीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची पहिली बैठक कारखान्याच्या सभागृहात झाली.

मावळते उपाध्यक्ष कैलास तांबे यांनी विखे पाटील यांच्या नावाची सूचना मांडली. त्यास सतीश ससाणे यांनी अनुमोदन दिले. विश्वास कडू यांच्या नावाची सूचना स्वप्नील निबे यांनी मांडली. साहेबराव म्हस्के यांनी अनुमोदन दिले. विखे पाटील यांनी 1987 ते 1992 आणि 1992 ते 1995 या काळात कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.


या वेळी विखे पाटील म्हणाले, की बाळासाहेब विखे पाटील यांच्या आदर्श वाटचालीनुसारच कारखान्याचे काम सुरू आहे. भविष्यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार कार्यक्षेत्रात ऊस निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे. कारखाना आधुनिकीकरणाचे मोठे काम झाले आहे. त्यामुळे आता चांगल्या क्षमतेने उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे.'' 
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बापूसाहेब आहेर, नंदकिशोर राठी, डॉ. भास्करराव खर्डे, तुकाराम बेंद्रे, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे आदी उपस्थित होते.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

SCROLL FOR NEXT