पश्चिम महाराष्ट्र

देश समृद्ध करणे हाच राष्ट्रवाद - राहुल सोलापूरकर

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - ‘देशाने आपल्याला स्वातंत्र्य, विचार, भाषा, ममत्व, व्यक्तित्त्व दिले. आपल्या आचार, विचार आणि कृतीतून देशाला समृद्ध करणे, हाच आपला धर्म आहे. आपली प्रत्येक कृती देशाला उन्नतीच्या दिशेने नेणारी आहे, याच भावनेने आपण कार्य केले पाहिजे. हाच राष्ट्रवाद आहे,’ असे प्रतिपादन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी येथे केले. भालचंद्र पाचलग स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे व्याख्यान झाले. 

भालचंद्र पाचलग यांच्या कुटुंबीयांनी याचे आयोजन केले होते. ‘राष्ट्रवाद हाच धर्म’ या विषयावर सोलापूरकर यांनी विचार मांडले. धर्म या संकल्पनेविषयी ते म्हणाले, ‘‘धर्म म्हणजे केवळ उपासना पद्धती नव्हे. ती व्यापक संकल्पना आहे. आपल्याकडे होऊन गेलेल्या अनेक महापुरुषांनी कर्तव्यालाच आपला धर्म मानला. ऐन तारुण्यात स्वातंत्र्यासाठी भगतसिंग फासावर चढले. मातृभूमीला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करणे, हाच त्यांनी आपला धर्म मानला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपले जीवन, कुटुंब, विद्वत्ता ऐवढेच नव्हे तर आपली काव्यप्रतिभाही मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी वाहिली. तो त्यांचा राष्ट्रधर्म होता. राधानगरी धरण पूर्ण करण्यासाठी ज्यांनी खर्चाचा आणि स्वतःच्या देहयातनांचाही विचार केला नाही, अशा राजर्षी शाहू महाराजांचा धर्म म्हणजे ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हाच होता. त्यांनी आपल्या राजधर्माचे पालन अखेरपर्यंत केले. काळाच्या ओघात धर्माची व्याख्याही बदलली. आचार, विचार आणि व्यवहारातून देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न करणे हेच आपले कर्तव्य आहे. त्यालाच धर्म म्हणतात.’’ 

राष्ट्रवादाबाबत ते म्हणाले, ‘‘प्रत्येकाने कार्य जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी वाचनासह चांगले ऐकणेही महत्त्वाचे आहे. संतसाहित्य, धर्मग्रंथ आणि पुराण यातील आध्यात्मिक अर्थ समजावून घेतला पाहिजे म्हणजे कृष्णाने कुरुक्षेत्रात सांगितलेला कर्मवाद लक्षात येईल. त्यातून जीवनाचे विहीत कार्य सापडेल. आपली प्रत्येक कृती देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारी आहे, याच भावनेने आपण विहीत कार्य केले पाहिजे हाच राष्ट्रवाद आहे.’’ विनायक पाचलग यांनी आभार मानले. 

हिंदू धर्म मानवातावादी आहे. या धर्मातच विश्‍वबंधूत्वाची कल्पना मांडली गेली. स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्मातील क्षमाशीलता, परोपकारी भाव जगासमोर मांडला. याच भावनेतून आपण आपला धर्म समजावून घेणे आवश्‍यक आहे. 
- राहुल सोलापूरकर,
प्रसिद्ध अभिनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअप अकाऊंट; नागरिकांकडे पैशांची मागणी

आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? जलवाहिन्या टाकल्या परंतु पाण्यावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT