Rain blow the Sangali district; hits the rabbi with grapes 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; द्राक्षासह रब्बीला कोट्यवधीचा फटका

विष्णू मोहिते

सांगली : जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळी वारे, विजांचा कडकडाटांसह झालेल्या पावसाने द्राक्षबागांसह रब्बी पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. तासगाव तालुक्‍यातील चार द्राक्ष बागा कोसळल्या. आज दिवसभरही गारवा असल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. 

30 हजार एकरांवरील बागातील द्राक्षमण्यांना तडा जाण्याची शक्‍यता आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, मका, गहू पिकांनाही या पावसाचा फटका बसला. पश्‍चिम भागात गहू भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सांगली, मिरजेत दोन तास मोठा पाऊस पडला. 

हवामान विभागाने चार दिवसांपूर्वी वादळी पावसाचे संकेत दिले होते. काही ठिकाणी पावसाची शक्‍यताही वर्तवली होती. जिल्ह्यात 1.15 लाख एकर द्राक्षबागा आहे. दोन महिन्यांपूर्वीच्या अवकाळीने 25 टक्के बागांचे नुकसान झाले. सद्य:स्थितीत 25 टक्के पक्क बागातील पावसाने मणी तडकण्याची शक्‍यता आहे. अशा 35 हजार एकरांवरील बागांना झटका बसू शकतो.

तासगाव, कवठेमहांकाळ, वाळवा, जत, पलूस, मिरज पूर्व भागातील द्राक्षबागांचे मणी सध्या गर भरण्याच्या अवस्थेत आहेत. पावसाच्या थेंबाचा मार लागून मणी खराब होऊ शकतात. घडात पाणी साचून कुजण्याची भीती आहे. यापासून बचावासाठी सकाळीच शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टरने कोरडा हवेचा मारा केला. त्यानंतर मणी तडकणार नाहीत यासाठी औषध मारली. 

द्राक्ष हंगामाच्या सुरवातीला चार किलोच्या पेटीला चारशे दर मिळाल्याने बागायतदार सुखावले होते. मात्र आता पुन्हा दर कोसळण्याच्या भीतीचे सावट आहे. यंदा अतिवृष्टीमुळे फळछाटण्या लांबल्याचा फटका बागायतदारांना बसत आहे. त्यात आता दोन दिवसांपासून पावसाच्या शक्‍यतेने व्यापाऱ्यांकडून मालाचा उठाव बंद झाला आहे. परिणामी दर घसरण्याची भीती आहे. पावसाने माल काढणी गुरुवारी ठप्प राहिली. 

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारीची पिके जोमात आहेत. गहू आणि हरभरा काढणीला आला असताना अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांनाही दणका दिल्याने नुकसानीची भीती आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांच्या हंगामाने गती घेतली आहे. पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक ऊस गाळपास गेला आहे. मात्र बुधवारच्या पावसाने ऊस तोडीवरही परिणाम झाला. ऊसतोड मजुरांच्या खोपटामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने त्यांचीही तारांबळ उडाली. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT