valchandnagar.
valchandnagar. 
पश्चिम महाराष्ट्र

रिमझिम पावसामध्ये चिमुरड्या मुलांचा ग्यानबा तुकारामाचा जयघोष

राजकुमार थोरात

वालचंदनगर - निमसाखर (ता.इंदापूर) येथील निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या एनईएस हायस्कुल व एमआर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्याच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.

पुणे जिल्हातुन संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत सोपानदेव महाराज यांचे पालखी सोहळे पंढरपूरकडे ग्यानबा तुकारामाच्या जयघोषामध्ये पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. आज सोमवार (ता.१६) रोजी निमसाखर मधील निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या एनईएस हायस्कुल व एमआर इंग्लिश मिडीयम स्कुलमधील चिमुरडे विद्यार्थ्यानी वारकऱ्यांच्या वेषामध्ये आले होते. शाळेमधून दिंडी सोहळ्यास सुरवात करण्यात आली.रिमझिम पावसामध्ये चिमुरडे मुले ग्यानबा तुकारामाचा जयघोष करीत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. निमसाखर गावामध्ये पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्यासाठी निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सुशिला रणवरे, सचिव रविंद्र रणवरे, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ.एन.जी.रणवरे, अरुणा रणवरे उपस्थित राहिले होते. पालखी सोहळ्याचे नियोजन इंग्लिश मिडीयमचे प्राचार्य पंकज खिलारे व दत्तात्रेय ढोबळे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

SCROLL FOR NEXT