mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

...नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर मिळेल, राजू शेट्टींना इशारा

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. उलट आपली भाषा आणि वर्तन सुधारावे अन्यथा शिवसेना स्टाईलने त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा तालुका शिवसेनाप्रमुख येताळा भगत यांनी दिला.

दोन दिवसापूर्वी खासदार राजू शेट्टी व भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्यात खडाजंगी झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात संघर्ष सुरू झाला. शिवसेनेच्या वतीने याबाबत मंगळवेढा - सोलापूर रोडवर रस्ता रोको आंदोलन केले. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार गणेश लव्हे यांना दिले. 

यावेळी स. पो. नि. महेश विधाते.पो.उ.निरीक्षक दत्तात्रय पुजारी, जि. प. सदस्य शैला गोडसे, राजीव बाबर, निवृत्ती जाधव, संभाजी खापे, तुकाराम भोजने, अरुण मोरे, अंबादास येडवे, अंबादास शिंदे, महादेव साखरे, रामहरी जाधव, बंडु गायकवाड, किसन सपकाळ, गंगाधर मसरे, राजीव मेतकुठे, नंदकुमार आसबे, दीपक कसगावडे, अभिजीत गाढवे, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. यावेळी बोलताना येताळा भगत म्हणाले की, पन्नास वर्षे ती परंपरा असलेल्या शिवसेनेला पंधरा वर्षाची परंपरा असलेल्या स्वाभिमानीने शिकवू नये. भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष. तानाजी सावंत यांनी 70 ते 80 शैक्षणिक संस्था, आठ साखर कारखानेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून तीनशे किलोमीटरची नाला सरळीकरण करून दिले. जलसंवर्धनाचे कामही चांगले केले. सामुदायिक विवाह सोहळा आयोजन केले. जबाबदार लोकप्रतिनिधी असतानाही शेतकऱ्यांचा पुळका घेऊन विनाकारण त्यांच्यावर आरोप करून चुकीची भाषा वापरून नुसतं संसदीय लोकप्रतिनिधीचा अवमान करून घेतला. 

शेतकऱ्यांच्या ऊसाला एफ, आर, पी, व अन्य योजना राबवण्याचे काम युती शासनाने केले आहे. हे खा. शेट्टीनी ध्यानात घ्यावे. यावेळी जिल्हा परिषदेचे शैला गोडसे यांनीही भाषणातून शेट्टीचा समाचार घेत आमदार सावंत यांनी विविध सामाजिक कार्य करूही केवळ चुकीचे आरोप केले असल्याचे त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT