पश्चिम महाराष्ट्र

रमेश भेंडीगिरी यांची कबड्डी निवडणुकीत एंट्री

संदीप खांडेकर

कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीची लगीनघाई सुरू असून, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडीगिरी यांनी निवडणुकीच्या रणांगणात ‘एंट्री’ केली आहे. सचिव पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला हे पद येणार का, याची उत्सुकता आहे. उपाध्यक्षपदाच्या दोन टर्मचा प्रा. संभाजी पाटील यांनी कारभार पाहिल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी प्रशिक्षणाचा अनुभव असलेल्या डॉ. भेंडीगिरी यांच्या पदाचा मार्ग बिनविरोध होईल का, याची चाचपणी सुरू आहे. येत्या २५ नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक होणार आहे.

कबड्डी असोसिएशन अंतर्गत २५ जिल्ह्यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्याने कबड्डीतील दबदबा कायम राखला आहे. डॉ. भेंडीगिरी राजर्षी शाहू महाविद्यालयात कबड्डी खेळाडू घडवत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया महिला संघाने इराणला पराभूत करत कबड्डीचे विश्‍वविजेतेपद पटकाविले होते. महाराष्ट्र राज्य संघाचा सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनियर संघाला गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन संघ अव्वल बनविले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या तीन खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी थायलंडमधील खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी कबड्डीतील डावपेचांवर शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली आहे.

यंदा सचिव पदाच्या निवडणुकीत त्यांनी अर्ज दाखल केला आहे. प्रा. पाटील अध्यक्षपदाची जबाबदारी उत्कृष्टरित्या सांभाळल्याने सचिव पदाचा मान कोल्हापूरला मिळावा, अशी कबड्डीप्रेमींची भावना आहे. 

क्रीडा मंत्रालयाची वयाची अट
क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदाच्या तीन, सचिव व खजिनदार पदाच्या दोन टर्म पूर्ण केल्यानंतर या पदांवरील व्यक्‍तींना पुन्हा निवडणुकीत अर्ज दाखल करता येणार नाही. वयाची सत्तरी पूर्ण केलेल्यांना सुद्धा निवडणुकीत सहभाग घेता येणार नाही. केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने तशा परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत या परिपत्रकानुसार अंमलबजावणी झाली आहे का, अशी विचारणा होऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT