rani channamma university belgaum exam problem education marathi news
rani channamma university belgaum exam problem education marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

राणी चन्नमा विद्यापीठाच्या कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका; सोमवारपासून सुरु होणार पदव्युत्तरची परीक्षा!

सतीश जाधव

बेळगाव :  राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत (आरसीयु) येणाऱ्या पदव्यूत्तरच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षातील परीक्षांना सोमवारपासून (ता.5) सुरुवात होणार आहे. मात्र, परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत असल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी दिसून येत आहे. बेळगावमधून आरसीयुला वेळेत बस नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेत उपस्थित राहण्यास अडचण येण्याची भिती निर्माण झाली आहे. विद्यापीठाच्या या भुमिकेमुळे विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. कुलगुरु व रजिस्टारनी परीक्षा वेळेत बदल करावा अशी मागणी होत आहे.

राणी चन्नमा विद्यापीठ बेळगाव शहरापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे. या विद्यापीठात बेळगाव, खानापूर, ,चंदगड, निपाणी, चिक्कोडी आदी 40 ते 50 किलोमीटर अंतरावर विद्यार्थी येतात. यापूर्वी सकाळी 10 ते 1 व दुपारच्या सत्रात परीक्षा घेतल्या जात होत्या. त्यावेळी कोणतीही अडचण येत नव्हती. मात्र, यंदा सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत परीक्षा करण्यात आल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. लांब पल्याच्या विद्यार्थ्यांना सकाळी 6 वाजता घरातून निघावे लागणार आहे. मात्र, बेळगाव डेपोमधून वेळेवर बसेस देखील नाहीत. त्यामुळे अडचणी येण्याची भिती विद्यार्थ्यांतून व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठात येण्यास उशीर होऊन परीक्षेला गैरहजर राहिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याचा विचार विद्यापीठाने करावा अशी मागणीही होत आहे. आरसीयु पहिल्या वर्षाच्या परीक्षा 5 एप्रिलपासून 22 एप्रिलपर्यंत तर दुसऱ्या वर्षातील सेमीस्टरच्या परीक्षा 6 एप्रिलपासून 23 एप्रिलपर्यंत होणार आहेत. मात्र, वेळेची विद्यार्थ्यांना वेळेची समस्या निर्माण झाली आहे.


विद्यापीठाअंतर्गत इतर महाविद्यालयात परीक्षेची वेळ सकाळी 9 ची आहे. तसेच काही महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनी सकाळी 9 ची वेळ परीक्षेसाठी अनुकुल असल्याचे म्हटले होते. त्यामुळे सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने 9 ची वेळ निश्‍चित करण्यात आली. हीच वेळ निश्‍चित असणार आहे. आता बदल करता येणार आहे.
रामचंद्रगौडा, कुलगुरु, राणी चन्नमा विद्यापीठ

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT