पश्चिम महाराष्ट्र

शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर उरकावे

सकाळवृत्तसेवा

भिलार : महाबळेश्वर तालुक्यातील महसूल विभागाने शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर उरकावे आणि तोपर्यंत शिधापत्रिका धारकांना रेशन देण्याची व्यवस्था ऑनलाईनचा आग्रह न धरता आणि अडवणूक न करता तातडीने पुरवावी अशी मागणी महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती रुपाली राजपूरे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली आहे. 

महाबळेश्वरच्या तहसीलदार मीनल कळसकर यांना दिलेल्या निवेदनात सभापती राजपूरे यांनी पुढे म्हटले आहे की, महाबळेश्वर तालुक्यात आपल्या महसूल विभागाच्या शिधापत्रिका ऑनलाईन करणेचे काम सुस्तपणे चालू असल्याचे दिसून येत आहे. रेशन दुकानदार रेशन कार्ड ऑनलाईन असलेशिवाय रेशनिंग देत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे शासकीय लाभापासून नागरिक वंचित राहत आहेत.
 प्रामुख्याने महाबळेश्वर तालुका डोंगराळ, अतिदुर्गम व विस्तीर्ण असा वसलेला तालुका असून या तालुक्यामध्ये असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानामध्ये रेशनिंगसाठी सध्या नागरीकाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः रेशनिंग कार्ड ऑनलाईन करण्याची प्रक्रिया आपल्या विभागाकडून धीम्या गतीने सुरु आहे.

ज्यांचे कार्ड ऑनलाईन झाले आहे अशाच रेशन कार्ड धारकास धान्य पुरवठा केला जात आहे. ज्यांचे कार्ड ऑनलाईन झाले नाही त्या कार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळत नाही. त्यामुळे हे नागरिक शासनाच्या लाभापासून वंचित राहत आहेत, तर बहुतांश गोरगरीब कुटुंबाची गुजराण रेशन धान्यावरच अवलंबून आहे. त्याची मोठी अडचण झाली आहे.
 याचा गांभीर्याने विचार करून विशेष मोहिमेद्वारे रेशन कार्ड ऑनलाईन करण्याचे काम तीव्र गतीने संपवण्यात यावे. तसेच या तालुक्यामध्ये आर्थिक दृष्ट्या सक्षम नसनारी असंख्य कुटुंबे असल्याने त्यांना रेशनिंगच्या लाभापासून वंचित न ठेवता ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तात्पुरती पर्यायी व्यवस्था निर्माण करून धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेवटी केली आहे. 
रेशनिंगच्या होणाऱ्या या अडचणीबाबतचे हे निवेदन सभापती रुपाली राजपूरे यांनी काल तहसीलदार मीनल कळसकर यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT