ratnagiri sakal
पश्चिम महाराष्ट्र

Ratnagiri : राजापूर बाजारपेठेतील अतिक्रमणे भुईसपाट

मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्याबरोबर हुज्जत; विसर्जन मिरवणूक निर्विघ्न

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अडथळा ठरणारी राजापूर बाजारपेठेतील अतिकमणे आणि झड्या हटविण्याचे पालिकेने आदेश देऊनही काही व्यापाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी पोलिस बंदोबस्तात अतिकमणांवर कारवाई केली. या कारवाईमुळे बाजारपेठेतील रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून, या कारवाईचे नागरिकांतून स्वागत केले जात आहे.

शहरातील बाजारपेठेतून जाणारा रस्ता मुळातच अरूंद आहे. त्यातच गणेशोत्सवात या रस्त्यावर अनेक दुकानदारांनी दुकाने थाटली होती. काही व्यापाऱ्यानी तर अध्या रस्त्यापर्यंत साहित्य थाटले होते. शिवाय दुकानासमोर रस्त्यावर झड्या उभारल्या होता. अनंत चतुर्दशीला या मार्गावरून गणेश विसर्जन मिरवणुका जात असल्याने सदरची अतिकमणे हटविण्याच्या सूचना नगर पालिकेने व्यापाऱ्यांना दिल्या होत्या. त्याबाबतच्या नोटिसाही प्रशासनाने बजाविल्या होत्या. मात्र, काही व्यापाऱ्यानी या नोटीसांना न जुमानता नगर पालिकेले आव्हान देण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी मुख्याधिकारी भोसले यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखेर मुख्याधिकारी भोसले यांनी या अतिक्रमणांवर काल धडक कारवाई करत अतिकमणे हटविली आहेत.

या कारवाईनंतर पुढील तीन दिवस नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी देखरेख ठेवणार असून यापुढे अतीक्रमणे करण्याचा पुन्हा प्रयत्न झाल्यास थेट न्यायालयीन कारवाईची प्रकिया हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आता शिवाजी महाराज रस्त्यावर कारवाई

बाजारपेठेनंतर आता अतिक्रमणे हटविण्याची कारवाई छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर केली जाणार आहे. या रस्त्याचे नुकतेच एक कोटी २२ लाख रुपये खर्च करून काँकीटीकरण करण्यात आले आहे. मुख्याधिकारी भोसले व सहकाऱ्यांनी केलेल्या या मोहिमेचे शहरातील नागरिकांनीच नव्हे, तर व्यापाऱ्यांनीही स्वागत केले आहे. शहराचा बकालपणा नष्ट करण्यासाठी नगरपालिका घेत असलेल्या भूमिकेचे व धाडसाचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT