red chilli price goes high...
red chilli price goes high... 
पश्चिम महाराष्ट्र

अन्‌ लाल मिरचीही भडकली... 

शिवाजीराव चौगुले


शिराळा : लॉक डाऊनमुळे चटणी कांडप केंद्र लॉक झाल्याने व बेडगी मिरची 270 रुपये किलो व मसाल्याच्या साहित्याचे दर भडकल्याने चटणी करायची कशी व पावसाळ्यात चटणी पुरणार कशी या चिंतेत महिला पडल्या आहेत. साहित्य अभावी खुरवड्या, पापड, शेवया करणे मुश्‍कील झाल्याने महिला वर्ग हैराण झाला आहे. 

मार्च, एप्रिल महिन्यात चटणी करण्यासाठी महिलांची मिरची कांडपवर महिलांची गर्दी असते. या दोन महिन्यात वर्षभर पुरेल एवढी चटणी करून ठेवतात. कडक ऊन असल्याने खुरवड्या, भातवड्या, वेपर्स, पापड, सांडगे केले जाते. गतवर्षी केलेली चटणी संपत आली आहे. कोरोनाच्या धास्तीने आता ग्रामीण भागातील नोकरी निमित्त बाहेर गेलेले लोक गावी आले असल्याने घरोघरी लोकांची संख्या वाढू लागली आहे.

त्यामुळे चटणी कमी व खाणाऱ्या लोकांची संख्या जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता चटणी कमी पडू लागली आहे. लॉक डाऊनमुळे मिरचीचे दर ही भडकले असून ती ही पुरेशी उपलब्ध होत नाही. मिरची कांडप बंद अडल्याने मिरची कुटायची कशी याची चिंता महिलांना लागली आहे. घरी असल्याने व सकाळी नास्तासाठी बेकरीचे पदार्थ खायला मिळत नाहीत.

वाडा पाव ही लॉक डाऊनने लॉक झाला असल्याने बाहेरचे चटपटीत खाणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे मुलांना घरात काय खायला घालायचे याची ही चिंता महिलांना पडली आहे. खुरवड्या,भातवड्या, शेवया, वेपर्स करण्यासाठी बटाटे व इतर साहित्याचे दर वाढल्याने उन्हाळी साहित्य कसे करायचे यांची चिंता महिलांना लागली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: एकाच ओव्हरमध्ये चेन्नईला जबरदस्त दुहेरी धक्का! रहाणेपाठोपाठ शिवम दुबे 'गोल्डन डक'वर बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT