Responsibility of Assistant Commissioner for stall in Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली खोक्‍यांचे शहर : जबाबदारी सहायक आयुक्तांची; मालमत्ता व अतिक्रमण विभागाची बघ्याची भूमिका

अजित झळके

सांगली ः शहराचे वाटोळे होत असताना एकमेकाकडे बोट दाखवून रिकामे होण्याचा जुना कार्यक्रम कायम आहे. खोक्‍यांचे प्रचंड अतिक्रमण होत आहे, पुन्हा एकदा हे खोक्‍यांचे शहर होत आहे, अशावेळी त्याला अटकाव करायला जबाबदार यंत्रणा तयार नाही. खोक्‍यांच्या अतिक्रणाचा हिशेब ठेवण्याची, त्यावर कारवाईसाठी पुढे जाण्याची मुख्य जबाबदारी मनपाच्या चार सहायक आयुक्तांची आहे. त्यानंतर मालमत्ता विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे काम सुरू होते, मात्र इथे तीनही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून रिकाम्या होत आहेत. 

महापालिका क्षेत्रात सांगलीत 3 हजार तर मिरजेत सुमारे 800 खोकी अधिकृत आहेत. त्यात महापालिकेने बांधून दिलेल्या गणेश मार्केटसह काही गाळ्यातील खोक्‍यांचा समावेश आहे. शहरात प्रत्यक्ष खोक्‍यांची संख्या याच्या किमान दुप्पट आहे. उदाहरण द्यायचे तर वसंतदादा शासकीय रुग्णालयाजवळील सगळी खोकी अनधिकृत आहेत. त्यातील खोक्‍यांचे क्रमांकही बोगस आहेत, त्यांनी करही भरलेला नाही. ही खोकी दहा ते पंधरा हजार रुपये महिने या दराने भाड्याने देण्यात आली आहेत. त्याचे भाडे घेणाऱ्यांत बरेच महापालिकेचे कारभारी आहेत. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांचा हा भाग होत नाही. त्यापेक्षा भूखंडांचा बाजार करण्यावरच महापालिकेचा जोर आहे आणि त्यातच अधिकारी, कारभारी रममान आहेत. परिणामी, गणपती मंदिरापासून ते विश्रामबाग चौकापर्यंत सगळीकडे खोकीच खोकी झाली आहेत. 

सन 2008 मध्ये साडेतीन हजार खोकी काढण्यात आली होती. त्यातील दीड हजाराहून अधिक खोक्‍यांचे पुनर्वसन झाल्याचे मालमत्ता विभागातून सांगण्यात आले. अन्य खोक्‍यांचा प्रश्‍न अजून बाकी आहे. म्हणजे, सध्याच्या खोक्‍यांमध्ये आणखी दोन हजार खोक्‍यांची भर पडणार आहे. ही खोकी रोखायची असतील तर आता नागरिकांनीच पुढे आले पाहिजे. नागरिकांनीच शहर खोकेमुक्तची जबाबदारी शिरावर घेतली पाहिजे. 

आदेश मिळाले की खोकी तोडून टाकतो 

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख दिलीप घोरपडे म्हणाले,""मला आदेश मिळाले की मी खोकी तोडून टाकतो. शिल्लक पण ठेवत नाही, मात्र आदेश आले पाहिजेत. कारण, अतिक्रमणातील, विनानंबरचे खोके असले तरी ते नोटीसशिवाय काढता येत नाही. ही नोटीस काढायचे अधिकारी ज्यांना आहेत, त्यांनी ती काढली पाहिजे. मिरजेत आम्ही खोकी फोडली होती, इथेही फोडून टाकू. कुणाचे लाड करायचे कारण नाही.'' 

नागरिकांनीच आता विरोधात मैदानात यावे 

"सांगली माझी चांगली' हा फलक कर्मवीर चौकात लावून महापालिकेची जबाबदारी संपत नाही. भिंतीवर "स्वच्छ सांगली...'चा नारा देऊन शहर विकायचा कार्यक्रम हाती घेणे, हे सांगलीकरांपासून लपून राहिलेले नाही. आता हे खोक्‍यांचे शहर होण्यापासून वाचवण्यासाठी नागरिकांनीच मैदानात यावे. राजवाडा चौकातील नागरिकांनी हे करून दाखवले आहे. तेच सर्वत्र झाले पाहिजे. कुणी रातोरात खोके आणून बसवत असेल तर त्याला हाकलून काढा. तो ऐकत नसेल तर गांधीगिरी मार्गाने त्याला अटकाव करा. सोबतच्या चौकटीत या अतिक्रमणांना जबाबदार अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत, त्यांना भेटा, तक्रारी द्या.

हे आहेत जबाबदार

  • सहायक आयुक्त सहदेव कावडे 
  • सहायक आयुक्त सावंता खरात 
  • सहायक आयुक्त सचिन पाटील 
  • सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड 
  • अतिक्रमण विभागाचे दिलीप घोरपडे 
  • मालमत्ता विभागाचे कोडबोले 

 संपादन : यवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : जेवणात झुरळ, पिन! COEP च्या मुलींच्या वसतिगृहात मनविसेचे तीव्र आंदोलन; विद्यापीठाला ७२ तासांचे अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: जिल्हा परिषद निवडणुकांची लवकरच घोषणा!

Railway Ticket Booking : रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये केला मोठा बदल!

Eknath Shinde : राळेगणसिद्धीत अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ!

Ashish Shelar : ‘वंदे मातरम्’ हे विकसित भारताच्या दिशादर्शनाचे गीत’ आशिष शेलार; ‘ध्यास वंदे मातरम्‌चा’ पुस्तकाचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT